लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पहिल्या सामन्यातील हाराकिरीनंतर पाकिस्तान संघात बरीच सुधारणा पाहायला मिळाली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात उसळी घेणाऱ्या चेंडूंचा सामना करण्यात लडखळारे पाकिस्तानचे फलंदाज इंग्लंडविरुद्ध पूर्ण तयारीने मैदानात उतरले होते. इमाम-उल-हक आणि फखर जमान यांनी पाकिस्तानचा दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. पण, इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीनं या जोडीला नजर लावली आणि दोन्ही सलामीवीरांना मागे पाठवले. जमान यष्टिचीत झाला, तर इमाम झेलबाद होऊन माघारी परतला. या दोन्ही विकेट घेताना इंग्लंडच्या खेळाडूंनी दाखवलेले कौशल्य वाखाण्यजोगे होते.
जमान आणि इमाम यांनी पहिल्या 10 षटकांत बिनबाद 69 धावा केल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत 1996नंतर पाकिस्तानच्या सलामीवीरांनी पहिल्या 10 षटकांत केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. 15व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अलीनं टाकलेल्या चेंडूचा अंदाज बांधण्यात जमान अपयशी ठरला आणि यष्टिमागे उभ्या असलेल्या बटलरने त्याची विकेट घेतली. त्याने वेगानं बेल्स उडवून जमानला तंबूत जाण्यास भाग पाडले. जमानने 40 चेंडूंत 6 चौकरांसह 36 धावा केल्या.
पाहा व्हिडीओ..