लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 साली इंग्लंडमध्येच वर्ल्डकप जिंकला होता. आता पुन्हा एकदा इंग्लंडमध्येच क्रिकेटचा वर्ल्डकप भरवला जात आहे. त्यामुळे मिशन वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाने देशाला पहिला वर्ल्डकप जिंकवून देणाऱ्या कपिल देव यांची खास भेट घेतली.
भारत वर्ल्डकप जिंकू शकतो, हे स्वप्न कपिल देव यांनी पहिल्यांदा सत्यात उतरवले. 1983 साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने दिग्गज वेस्ट इंडिजला पराभूत केले होते. यापूर्वी झालेल्या दोन्ही वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजने बाजी मारली होती. त्यामुळे 1983 साली वेस्ट इंडिज विजयाची हॅट्ट्रिक साजरी करणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पण भारताने वेस्ट इंडिजला पराभूत करत पहिल्यांदाच वर्ल्डकप पटकावला होता.
गुरुवारी खेळाडूंसाठी एका खास मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी खेस भेट घेतली. यावेळी बऱ्याच गोष्टी कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंना सांगितल्या. या भेटीनंतर भारतीय संघाचे मनोबल उंचावल्याचे म्हटले जात आहे.
वर्ल्डकपपूर्वीच कोहली झाला 'या' गोलंदाजाचा फॅनभारतीय संघ वर्ल्डकप खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघ कसून सरावही करत आहे. पण सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली हा एका गोलंदाजाचा चक्क फॅन झाला आहे. हा गोलंदाज भारतीय संघातील नसला तरी कोहलीला त्या गोलंदाजाने भूरळ पाडली आहे.
इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर भारतीय संघाने नेट्समध्ये चांगला सराव केला. वर्ल्डकपला 30 जूनपासून सुरुवात होणार आहे. पण वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वीच कोहलीने एका गोलंदाजावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. हा गोलंदाज नेमका कोण, याबद्दल साऱ्यांनाच उत्सुकता आहे.
वर्ल्डकपपूर्वी आयपीएल खेळवण्यात आली. आयपीएलमध्ये या गोलंदाजाने आपली चमक दाखवली होती. त्याबरोबर आपल्या राष्ट्रीय संघाकडून खेळतानाही या गोलंदाजाने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे क्रिकेट जगतामध्ये या गोलंदाजाचा चांगलाच दबदबा आहे. हा गोलंदाज आहे अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खान.
रशिदबद्दल विराट म्हणाला की, " गेल्या तीन वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मी रशिदविरुद्ध खेळलेलो नाही. मला रशिदविरुद्ध खेळायचे आहे. तो एक चांगला गोलंदाज आहे. जोपर्यंत फलंदाज कसा चेंडू खेळायचा विचार करतो, तोपर्यंत बॉल बॅटवर आलेला असतो. त्यामुळे रशिदच्या गोलंदाजीचा सामना करणे सोपे नाही. त्यामुळे मला त्याची गोलंदाजी आवडते आणि त्यामुळेच मला त्याच्या गोलंदाजीविरुद्ध खेळायचे आहे."