- हर्षा भोगले
विश्वचषक लढतीत तुम्हाला कुठल्या संघाविरुद्धच्या लढतीच्या पूर्वसंध्येलाच दोन गुण मिळायला नको, पण भारतीय संघाची कामगिरी बघता आणि अफगाणिस्तानची निराशाजनक कामगिरी बघितल्यानंतर असे घडणे निश्चित आहे.
अफगाणिस्तानच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा आदर करतो, पण सध्या हा संघ अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. ते खूश आहेत किंवा नाही, याची मला कल्पना नाही, पण त्यांना आनंद मिळेल असे ते नक्कीच खेळताना दिसत नाही. अफगाणिस्तानसाठी क्रिकेट एक जल्लोषाचे माध्यम ठरले आहे, पण यावेळी मात्र ते दडपणाखाली असल्याचे दिसून येत आहे. या गर्तेतून ते लवकर बाहेर पडतील अशी आशा आहे.
भारतासाठी या लढतीचे काय महत्त्व आहे ? सावधगिरीने खेळावे लागेल, कारण बेजबाबदारपणा एका व्हायरसप्रमाणे असतो आणि संघात असे काही खेळाडू आहेत की त्यांना मैदानावर उतरण्याची विशेष संधी मिळालेली नाही. मी केदार जाधव व विजय शंकर यांना धावा फटकावताना बघण्यास उत्सुक आहे आणि त्याचप्रमाणे धोनीलासुद्धा. कारण अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंचे निश्चितच आव्हान राहील. धावा फटकावण्यापेक्षा अधिक चांगली बाब काय ठरू शकते.
मी मोहम्मद शमीकडून एक चांगला स्पेल बघण्यास उत्सुक आहे. माझ्या मते त्याला पहिल्या लढतीपासून संधी मिळायला हवी होती, पण भुवनेश्वरही चांगली गोलंदाजी करीत होता. आता त्याच्याकडे संधी आहे. भुवनेश्वर संघात परतल्यानंतर पुन्हा त्याला राखीव खेळाडूंमध्ये बसावे लागेल, पण त्यामुळे संघ मजबूत होईल.
भारताचे लक्ष्य आता उपांत्य फेरीऐवजी गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्यावर असायला हवे. संकेत चांगले असून भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघांना सहज पराभूत केलेले आहे. थंड व खराब वातावरण आपला पिच्छा पुरवत असल्याचे दिसून येत आहे. जेव्हा मी स्तंभलेखन करत आहे, त्यावेळी मला समोर कव्हर्स दिसत आहे. मी निळे आकाश बघितले त्यास प्रदीर्घ कालावधी लोटला आहे. कव्हर्स आपली भूमिका चोख बजावतील आणि खेळपट्टी थोडी कोरडी राहील आणि आम्हाला भारताचा विजय बघता येईल, अशी आशा आहे.
Web Title: ICC World Cup 2019: Kedar, Vijay and Dhoni's big knocks
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.