ICC World Cup 2019 : लसिथ मलिंगा मायदेशी परतणार, हे आहे कारण...

मायदेशी परतण्याचे कारण त्याने श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला सांगितले असून त्यांनी मलिंगाला परवानगी दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 05:09 PM2019-06-11T17:09:24+5:302019-06-11T17:10:06+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Lasith Malinga to return home, this is reason ... | ICC World Cup 2019 : लसिथ मलिंगा मायदेशी परतणार, हे आहे कारण...

ICC World Cup 2019 : लसिथ मलिंगा मायदेशी परतणार, हे आहे कारण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाकडून चांगली कामगिरी पाहायला मिळालेली नाही. त्यामध्येच त्यांना अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या रुपात अजून एक धक्का बसू शकतो. कारण लसिथ मलिंगा हा मायदेशी परतणार आहे. मायदेशी परतण्याचे कारण त्याने श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला सांगितले असून त्यांनी मलिंगाला परवानगी दिली आहे.

आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमध्ये श्रीलंकेला एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. श्रीलंकेला अफगाणिस्तानवर विजय मिळवता आला होता. या विजयात मलिंगाचाही वाटा होता. त्यामुळे आता मलिंगा संघात नसेल तर श्रीलंकेचे काय होणार, हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

आज श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यामधील सामना होणार होता. पण पावसामुळे हा सामना अद्याप होऊ शकलेला नाही. बांगलादेविरुद्धच्या सामन्यानंतर मलिंगा मायदेशी परतणार आहे.

मलिंगाची सासू कांती परेरा यांचे निधन झाले आहे. कांती यांच्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी मलिंगा कोलंबोला परतणार आहे. त्यानंतर मात्र मलिंगा इंग्लंडमध्ये परतणार आहे. पण मलिंगा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी संघात परतणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

याबाबत श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने सांगितले की, " मलिंगाच्या सासूचे निधन झाले आहे आणि त्याला अंतिम संस्कार करण्यासाठी कोलंबोला जावे लागणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर तो श्रीलंकेला रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो संघात दाखल होईल, अशी आम्हाला आशा आहे."


धवनपाठोपाठ 'हा' खेळाडूला विश्वचषकाच्या सामन्याला मुकणार
भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकणार असल्याचे वृत्त आहे. भारतीय संघासाठी हा फार मोठा धक्का आहे. पण आता धवननंतर एक खेळाडूही विश्वचषकाला मुकणार असे समजत आहे.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसलाही दुखापत झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मार्कसला खेळता येणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी मिचेल मार्शला संघात पाचारण करण्यात आले आहे.



दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांविरुद्घचे सामने जिंकून विश्वचषक स्पर्धेत जोरदार सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत घणाघाती शतकी खेळी करणारा डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना हाताला झालेल्या दुखापतीमुळे धवनला तीन आठवडे संघाबाहेर राहावे लागणार आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लढतीत शिखर धवनने शानदार शतकी खेळी केली होती. त्याने रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीसमवेत केलेल्या मोठ्या भागीदाऱ्यांमुळे भारतीय संघाला साडेतीनशेपार मजल मारता आली होती. मात्र या खेळीदरम्यान नाथन कुल्टर-नीलचा एक उसळता चेंडू हातावर बसून शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. दुखापत बळावल्याने तो क्षेत्ररक्षणालाही येऊ शकला नव्हता. 

Web Title: ICC World Cup 2019: Lasith Malinga to return home, this is reason ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.