लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा संथ खेळ, हा यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे त्याच्यावर चहुबाजूनं टीका होत आहे. अनेकांनी तर त्याला निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे. फलंदाजीत चाचपडणारा धोनी यष्टिंमागेही अपयशी ठरताना दिसत आहे. त्यानं वर्ल्ड कप स्पर्धेत काही चपळ क्षेत्ररक्षण केले आहेत, परंतु त्याचे अपयश झाकण्यासाठी ते प्रयत्न पुरेसे नाहीत.
38 वर्षीय धोनीनं यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक 24 बाईज धावा दिल्या आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स केरीचा ( 9 बाईज) क्रमांक येतो. त्यापाठोपाठ वेस्ट इंडिजया शे होप आणि इंग्लंडचा जॉस बटलर ( प्रत्येकी 7 बाईज) आणि न्यूझीलंडचा टॉम लॅथम व बांगलादेसचा मुश्फीकर रहीम ( 6 बाईज) यांचा क्रमांक येतो. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 42 व्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर धोनीनं सोपा चेंडू सोडला. समालोचकांनीही धोनीकडून अशी चूक होण्याची ही दुर्मिळ घटना असल्याचे नमूद केले.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात धोनीनं तीन झेल व एक स्टम्पिंग केली. या कामगिरीसह एका सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा भारतीय यष्टिरक्षक ठरला आहे. नयन मोंगिया आणि सय्यद किरमानी यांनी एका सामन्यात प्रत्येकी पाच बळी टिपले होते. या स्पर्धेत धोनीनं सहा झेल टिपले आहेत आणि 3 स्टम्पिंग केल्या आहेत. यष्टिरक्षकांमध्ये तो आठव्या स्थानावर आहे.
फलंदाजीत धोनीला 44.60च्या सरासरीनं 223 धावा करता आल्या आहेत.
भारतीय संघाने सेलिब्रेट केला धोनीचा वाढदिवस, पाहा व्हिडीओभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज 38 वा वाढदिवस. धोनीचा हा वाढदिवस टीम इंडियाने सेलिब्रेट केला. यावेळी धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवाही उपस्थित होती.
फिरकीवर खेळायचं कसं, शास्त्री गुरुजींनी दिल्या धोनीला टिप्समुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी फिरकी गोलंदाजांचा सामना कसा करायचा याच्या टिप्स धोनीला दिल्या आहेत. शास्त्री हे स्वतः डावखुरे फिरकीपटू होते आणि त्यांच्या नावावर कसोटीत 151 व वन डेत 129 विकेट्स आहेत. त्यामुळे शास्त्रींच्या टिप्सचा फायदा धोनीला पुढील सामन्यांत नक्की होईल. वर्ल्ड कप स्पर्धेत धोनीला यंदा साजेशी कामगिरी करता आलेली नाही. संथ खेळीमुळे त्याच्यावर टीका होत आहे. त्यामुळेच धोनीला आजच्या सामन्यात विश्रांती देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धोनीला 7 सामन्यांत 223 धावा करता आल्या आहेत आणि त्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या ( 56*) एकमेव अर्धशतकाचा समावेश आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीनं सन्मानाने निवृत्ती स्वीकारावी अशी अनेकांची मागणी आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना वर्ल्ड कपनंतर धोनी निवृत्ती स्वीकारेल, असे सांगितले होते. पण, धोनी पुन्हा फॉर्मात येण्यासाठी प्रयत्नशील आहे. IANSच्या वृत्तानुसार शनिवारी धोनीनं नेट्समध्ये शास्त्रींकडून फिरकीवर कसे खेळायचे याबाबतचा सल्ला घेतला.