लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : सध्याच्या घडीला इंग्लंडमध्ये विश्वचषक सुरु आहे. या विश्वचषकात एका अनोख्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. हा विक्रम कर्णधारांशी निगडीत आहे. पण हा विक्रम धोनीने यापूर्वीच एका विश्वचषकात केला आहे. हा विक्रम नेमका कोणता, ते जाणून घ्या...
शुक्रवारी विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यामध्ये सामना झाला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू एक विक्रम आपल्या नावावर केला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर विजय मिळवला. या विजयात फॅफचा महत्वाचा वाटा होता. कारण फॅफने नाबाद 96 धावांची खेळी साकारली होती. या त्याच्या नाबाद 96 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला होता. नव्वदीमध्ये नाबाद राहीलेला फॅफ हा विश्वचषकातील तिसरा कर्णधार ठरला आहे.
यापूर्वी 1996 साली झालेल्या विश्वचषकात वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार रिची रीचर्ड्सन यांच्या नावावर हा विक्रम पहिल्यांदा नोंदवला गेला. 1996 साली झालेल्या विश्वचषकात रीचर्ड्सन हे नाबाद 93 धावांची खेळी साकारून माघारी परतले होते.
धोनीच्या बाबतीत हा विक्रम नोंदवला गेला तो 2011 साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या अंतिम फेरीत नाबाद 91 धावांची खेळी साकारली होती. धोनी या सामन्यात नव्वदी गाठेल, असे बऱ्याच जणांना वाटले नव्हते. पण धोनीने षटकार लगावत भारताच्या विश्वविजयावर शिक्कामोर्तब केले. या षटकारासह धोनीने नव्वदीमध्ये प्रवेश करत भारताला विश्वचषक जिंकवून दिला होता.
धोनीने बॅट बदलली, नशिब बदललं; लगावला खणखणीत षटकारवेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्या महेंद्रसिंग धोनी जेव्हा खेळायला आला तेव्हा भारताचे दोन झटपट विकेट्स पडले होते. त्यामुळे धोनी सुरुवातीला फारच संथ खेळत होता. पण त्यानंतर त्याने आपील बॅट बदलली आणि नशिब बदल्याचं पाहायला मिळालं. कारण या नवीन बॅटमधून त्याने खणखणीत षटकार लगावल्याचे पाहायला मिळाले.
वेस्ट इंडिजचे अखेरचे षटक वेगवान गोलंदा ओशाने थॉमस टाकत होता. अखेरच्य षटकातील पहिल्या पाच चेंडूवर धोनीने १० धावा वसून केल्या होत्या. त्यानंतर मात्र धोनीने आपली बॅट बदलली. बॅट बदलल्यावर पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार लगावल्याचे पाहायला मिळाले.