मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघातील दिनेश कार्तिकचे नाव हे सर्वांना आश्चर्यात टाकणारे ठरले. वर्ल्ड कप संघात आपले नाव असेल, याची खात्री कार्तिकलाही नव्हती. महेंद्रसिंग धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून गेले कित्येक दिवस रिषभ पंतच्याच नावाची चर्चा होती आणि पंतच वर्ल्ड कपमध्ये खेळेल असा दावा केला जात होता. पण, त्या सर्व दाव्यांना फोल ठरवले. कार्तिकनेही या निवडीवर आश्रर्च व्यक्त केले. पण, धोनीच्या उपस्थितीत कार्तिकला खेळण्याची संधी मिळते की नाही, याबाबत साशंकता आहे.
ICC World Cup 2019 : तिसऱ्या प्रयत्नात कार्तिकला वर्ल्ड कपची बस पकडता आली, पण...
कार्तिकलाही याची कल्पना आहे. त्यामुळे वर्ल्ड कप संघात निवड झाल्यानंतर तो म्हणाला,''मी धोनीसाठी First-Aid Kit आहे. पण, मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची किंवा फिनिशरची भूमिका बजावण्याची संधीही मिळू शकते. आयपीएलनंतर आत्मविश्वासाने मी वर्ल्ड कपच्या तयारीला लागणार आहे. देण्यात येणारी जबाबदारी मी सक्षमपणे पार पाडू शकतो, याचा मला विश्वास आहे.''
India Squad For World Cup 2019: वन डे वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, दिनेश कार्तिकला संधी
पंतची निवड न झाल्याच्या मुद्यावर कार्तिक म्हणाला,''महत्त्वाच्या स्पर्धेत कोणाची निवड होते, तर कोणाची होत नाही. पण, मी कधी पंतच्या नावाची चर्चा केली नाही. त्याची निवड झाली असती तर मी निराश झालो असतो. आता माझी निवड झाली आहे, तर तोही थोडासा निराश झाला असेल.''
ICC World Cup 2019 : ईजा, बिजा, तिजा ठरलाच, पण चौथ्या स्थानाचाही तिढा सुटला!
कार्तिक हा पंतसारखा हार्ड हिटर नाही, परंतु यष्टिमागे त्याची कामगिरी ही नक्कीच वरचढ आहे. महेंद्रसिंग धोनी काही कारणास्तव खेळू शकला नाही, तर कार्तिक हा इंग्लंडच्या वातवरणात यष्टिमागे उत्तम पर्याय ठरु शकतो. पंतकडे प्रचंड प्रतिभा असल्याचा उल्लेख निवड समिती प्रमुखांनी केला. कार्तिकला तिसऱ्या प्रयत्नात वन डे वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्यात यश आले आहे.
2004 मध्ये त्याने वन डे संघात पदार्पण केले. त्यानंतर 2007 च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून त्याने संघात स्थान पटकावले, परंतु त्याला एकही सामना खेळता आला नाही. 2011 आणि 2015 मध्ये त्याला संभाव्य संघातही स्थान मिळाले नव्हते.
Web Title: ICC World Cup 2019 : With MS Dhoni in team, I'm just a small first-aid kit, says Dinesh karthik
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.