Join us  

ICC World Cup 2019 : सचिन तेंडुलकरसाठी बनवला इंग्लंडमध्ये नवा नियम

सचिनसाठी तब्बल 129 वर्षांपूर्वीच नियम बदलण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 8:02 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला क्रिकेट विश्वात सर्वाधिक मान आहे. त्याच्यासाठी पायघड्या घातल्या जातात. इंग्लंडमधील लोकं हे नियमांवर चालणारी असतात. नियमावर बोट ठेवत असतात. त्यामुळे ते कुणासाठी नियम बदतील, या शक्यतेचा विचारच करू शकत नाही. पण सचिनसाठी मात्र इंग्लंडला एक नियम बदलावा लागला. सचिनसाठी तब्बल 129 वर्षांपूर्वीच नियम बदलण्यात आला.

सध्याच्या घडीला इंग्लंडमध्ये विश्वचषक सुरु आहे. यंदाच्या विश्वचषकात सचिन समालोचन करताना दिसत आहे. भारताच्या सामन्याच्या मध्यंतरात सचिन आपली स्पेशल कमेंट देतानाही दिसतो. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये सध्या तो बऱ्याच गोष्टी करतानाही दिसत आहे.

सचिन इंग्लंडमध्ये काही वेळी कौंटी क्रिकेटही खेळला आहे. सचिन 1992 साली इंग्लंडमध्ये यॉर्कशायरकडून कौंटी क्रिकेट खेळला होता. यावेळी यॉर्कशायरने सचिनसाठी 129 वर्षांचा जुमान नियम बदलला होता. आता विश्वचषक सुरु असताना या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

काय होता हा 129 वर्षांपासूनचा जुना नियमयॉर्कशायर क्लब 1863 स्थानी स्थापन करण्यात आला. या क्लबच्या स्थापनेपासून एक नियम बनवण्यात आला होता. क्लबमधून कोणत्याही परदेशी क्रिकेटपटूला खेळण्याची संधी देण्यात येऊ नये, हा तो नियम होता. सचिनसाठी हा नियम मोडून यॉर्कशायरने त्याला संघात स्थान दिले होते.

सचिन तेंडुलकरची भविष्यवाणी ठरली खरी, आता विश्वविजेत्याचे नाव सांगणार...भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने विश्वचषकापूर्वीच भविष्यवाणी केली होती. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत कोण संघ पोहोचणार, हे सचिनने विश्वचषकापूर्वीच सांगितले होते आणि ती भविष्यवाणी आता खरी ठरलेली पाहायला मिळते आहे.

सचिनने विश्वचषकापूर्वीच ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड हे तीन संघ उपांत्य फेरीत पोहोचणार, असे म्हटले होते. चौथ्या स्थानासाठी सचिनने न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन संघाचे नाव घेतले होते. सचिनची भविष्यवाणी आता खरी ठरलेली पाहायला मिळत आहे. आता विश्वचषक कोणता संघ जिंकणार, याची भविष्यवाणी सचिन कधी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Google चे सीईओ सुंदर पिचाई जेव्हा धोनीचा 'तो' डायलॉग वापरतात...भारत आणि इंग्लंड यांच्यातील लढतीला गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी उपस्थिती लावली होती. महान फलंदाज सचिन तेंडुलकरसोबत स्टेडियममध्ये बसून त्यांनी हा सामना पाहिला होता. तेंडुलकरने पिचाईंसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्टकरताना त्याखाली गमतीशीर कमेंट लिहिली होती आणि त्यावर पिचाई यांनीही मजेशीर उत्तर दिले. यावेळी पिचाई यांनी कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा एक डायलॉग उचलला आणि तेंडुलकरला उत्तर दिले.

टॅग्स :सचिन तेंडुलकरवर्ल्ड कप 2019इंग्लंड