साऊदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : अत्यंत रंगतदार झालेल्या लढतीत वेस्ट इंडिजवर अवघ्या 5 धावांनी मात करत न्यूझीलंडने यंदाच्या विश्वचषकातील पाचव्या विजयाची नोंद केली. न्यूझीलंडने दिलेल्या 292 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेल आणि सिमरॉन हेटमायरच्या झंझावाती फलंदाजीनंतर मधली फळी कोलमडली. मात्र तुफानी शतकी खेळी करताना कार्लोस ब्रेथवेटने लढतीत रंगत आणली होती. शतक पूर्ण केल्यानंतर ब्रेथवेटने मारलेला एक उत्तुंग फटका ट्रेंट बोल्टने सीमारेषेनजीक टिपला आणि न्यूझीलंडला पाच धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. न्यूझीलंडने दिलेल्या 292 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात अडखळती झाली. शाय होप आणि निकोलस पूरन झटपट बाद झाले. मात्र स्फोटक ख्रिस गेल आणि शिमरॉन हेटमायर यांनी केलेल्या तुफानी खेळीमुळे वेस्ट इंडिजने लढतीत पुनरागमन केले. पण हेटमायर (54), जेसन होल्डर (0) आणि ख्रिस गेल (87) पाठोपाठ बाद झाल्याने विंडिजचा डाव कोलमडला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019 : रोमांचक लढतीत विंडीजला नमवून न्यूझीलंडची अव्वलस्थानी झेप
ICC World Cup 2019 : रोमांचक लढतीत विंडीजला नमवून न्यूझीलंडची अव्वलस्थानी झेप
अत्यंत रंगतदार झालेल्या लढतीत वेस्ट इंडिजवर अवघ्या 5 धावांनी मात करत न्यूझीलंडने यंदाच्या विश्वचषकातील पाचव्या विजयाची नोंद केली.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 2:25 AM