टौंटन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : जिमी निशॅम आणि लॉकी फर्ग्युसन यांच्या भेदक माऱ्यासमोर अफगाणिस्तान संघाने शरणागती पत्करली. वर्ल्ड कप स्पर्धेतील शनिवारच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनेअफगाणिस्तान संघाला 172 धावांत गुंडाळले. निशॅमने ( 5/31) पाच विकेट घेत न्यूझीलंडच्या दिग्गज गोलंदाजांच्या पंक्तित स्थान पटकावले. वर्ल्ड कप स्पर्धेत एका सामन्यात पाच विकेट घेणारा तो न्यूझीलंडचा पाचवा गोलंदाज ठरला. यापूर्वी रिचर्ड हॅडली ( वि. श्रीलंका, 1983), शेन बाँड ( वि. ऑस्ट्रेलिया 2003), टीम साऊदी ( वि. इंग्लंड 2015) आणि ट्रेंट बोल्ट ( वि. ऑस्ट्रेलिया 2015) यांनी अशी कामगिरी केली आहे. निशॅमला फर्ग्युसनची तोडीस तोड साथ लाभली. फर्ग्युसनने 4 विकेट घेतल्या.
अफगाणिस्तानकडून हझरत झाझल ( 34), नूर अली झाद्रान ( 31), हशमदुल्लाह शाहीदी ( 59) यांनीच समाधानकारक कामगिरी केली. बिनबाद 60 धावांवरून अफगाणिस्तानची अवस्था 4 बाद 70 अशी दयनीय झाली होती. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 172 धावांत तंबूत परतला.
Web Title: ICC World Cup 2019: New Zealand wrap up Afghanistan, they are all out on 172 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.