ICC World Cup 2019 : भारताला नमवण्यासाठी न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराचा खास प्लॅन

न्यूझीलंडने आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 05:33 PM2019-06-11T17:33:51+5:302019-06-11T17:34:28+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: New Zealand's former captain plans to downplay India | ICC World Cup 2019 : भारताला नमवण्यासाठी न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराचा खास प्लॅन

ICC World Cup 2019 : भारताला नमवण्यासाठी न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराचा खास प्लॅन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताचा तिसरा सामना न्यूझीलंडबरोबर गुरुवारी होणार आहे. या सामन्याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना असेल. कारण हे दोन्ही संघ चांगलेच तुल्यबळ आहेत. त्याचबरोबर दोन्ही संघांना आतापर्यंत विश्वचषकात पराभव स्वीकारावा लागालेला नाही. पण भारताला नमवण्यासाठी न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराने खास प्लॅन आखल्याचे म्हटले जात आहे.

भारताने आतापर्यंत विश्वचषकात दोन सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत केले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने साडे तिनशे धावांचा पल्ला गाठला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. पण आता तिसऱ्या सामन्यात त्यांची गाठ पडणार आहे ती न्यूझीलंडबरोबर. न्यूझीलंडने आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे.

न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरीने आता भारताविरुद्ध खास प्लॅन आखला आहे. व्हेटोरी हा आयपीएलमध्ये खेळला होता. त्याचबरोबर आता तो प्रशिक्षणही देत आहे. मुख्य गोष्ट म्हणजे आयपीएलमधील विराट कोहीलच्या आरसीबीमधूनच व्हेटोरी खेळला होता. त्यामुळे कोहलीचे कच्चेदुवे व्हेटोरीला चांगलेच माहिती असल्याचे बोलले जात आहे.

व्हेटोरीने न्यूझीलंडच्या संघाला सांगितले की, " भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांमध्ये गुणवान खेळाडू आहेत. त्यामुळे हा सामना चांगलाच अटीतटीचा होऊ शकतो. जर न्यूझीलंडच्या संघाने दडपण योग्यपद्धतीने हाताळले तर त्यांना भारतावर विजय मिळवता येऊ शकतो. "

 

टीम इंडियाला जबरदस्त धक्का, दुखापतीमुळे शिखर धवन तीन आठवडे संघाबाहेर

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांविरुद्घचे सामने जिंकून विश्वचषक स्पर्धेत जोरदार सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत घणाघाती शतकी खेळी करणारा डावखुरा सलामीवीर शिखर धवनदुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना हाताला झालेल्या दुखापतीमुळे धवनला तीन आठवडे संघाबाहेर राहावे लागणार आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लढतीत शिखर धवनने शानदार शतकी खेळी केली होती. त्याने रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीसमवेत केलेल्या मोठ्या भागीदाऱ्यांमुळे भारतीय संघाला साडेतीनशेपार मजल मारता आली होती. मात्र या खेळीदरम्यान नाथन कुल्टर-नीलचा एक उसळता चेंडू हातावर बसून शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. दुखापत बळावल्याने तो क्षेत्ररक्षणालाही येऊ शकला नव्हता. 

दरम्यान, आज हाताचा स्कॅन केल्यानंतर  शिखरच्या हालाता झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शिखर धवनला पुढील तीन आठवडे क्रिकेटपासून दूर राहावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. आता शिखर धवनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीमध्ये लोकेश राहुल सलामीला येण्याची शक्यता आहे. 

Web Title: ICC World Cup 2019: New Zealand's former captain plans to downplay India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.