ICC World Cup 2019 NZvSL : याला म्हणतात लक; चेंडू स्टम्प्सवर आदळला, पण बेल्स तशाच राहिल्या; पाहा व्हिडीओ

ICC World Cup 2019 NZvSL : श्रीलंका संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवात काही ठिक झालेली नाही. न्यूझीलंडच्या जलद माऱ्यासमोर त्यांचे सहा फलंदाज अवघ्या 60 धावांवर माघारी परतले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 04:28 PM2019-06-01T16:28:49+5:302019-06-01T16:29:06+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 NZvSL : Lahiru Karunaratne's lucky escape! Ball hits the stumps but bails unmoved | ICC World Cup 2019 NZvSL : याला म्हणतात लक; चेंडू स्टम्प्सवर आदळला, पण बेल्स तशाच राहिल्या; पाहा व्हिडीओ

ICC World Cup 2019 NZvSL : याला म्हणतात लक; चेंडू स्टम्प्सवर आदळला, पण बेल्स तशाच राहिल्या; पाहा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कार्डीफ, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : श्रीलंका संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवात काही ठिक झालेली नाही. न्यूझीलंडच्या जलद माऱ्यासमोर त्यांचे सहा फलंदाज अवघ्या 60 धावांवर माघारी परतले आहेत. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गोलंदाजांनीही कर्णधार केन विलियम्सनचा हा निर्णय योग्य ठरवला. मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन यांनी अनुक्रमे 3 व 2 विकेट घेत श्रीलंकेची त्रेधातिरपीट उडवली. एकीकडे निम्मा संघ माघारी परतला असताना दिमुथ करुणारत्ने खिंड लढवत होता. पण, त्यालाही नशीबाची साथ मिळाली. सामन्याच्या सहाव्याच षटकात त्याची दांडी गुल झाली होती. पण, तरीही तो मैदानावर खेळत राहिला. 

प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेला पहिल्या षटकातच धक्का बसला. लाहीरू थिरीमाने ( 4) दुसऱ्याच चेंडूवर पायचीत होऊन माघारी परतला. त्यानंतर आलेल्या कुशल मेंडिसलाही ( 0) हेन्रीने बाद केले. सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर करुणारत्नेने कट मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू बॅटीचे चुंबन घेत यष्टिवर आदळला. पण, बेल्स जशाच्या तशा राहिल्या आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी डोक्याला हात लावला.

पाहा व्हिडीओ...



 

Web Title: ICC World Cup 2019 NZvSL : Lahiru Karunaratne's lucky escape! Ball hits the stumps but bails unmoved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.