लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तानचा विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजने धुव्वा उडवल्याचे पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानचा 105 धावांत खुर्दा उडवला. पाकिस्तानच्या फक्त चार फलंदाजांनाच दोन अंकी धावसंख्या उभारता आली.
नॉटिंगहॅमच्या खेळपट्टीवर वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण ठरले. वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचा हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी योग्य असल्याचे सामन्याच्या सुरुवातीपासूनच दाखवून दिले. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत पाकिस्तानच्या गोलंदाजांना आपल्या तालावर नाचवले.
तिसऱ्याच षटकात इमाम उल हकच्या रुपात पाकिस्तानला पहिला धक्का बसला. त्यानंतर फखर झमान आणि बाबर आझम यांनी प्रत्येकी २२ धावा करत संघाला सारवण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये ते अपयशी ठरले. आंद्रे रसेलने फखर झमानला क्लीन बोल्ड करत ही जोडी फोडली आणि त्यानंतर पाकिस्तानचा डाव गडगडला.
पाकिस्तानने विश्वचषकापूर्वी इंग्लंडबरोबर एकदिवसीय मालिका खेळली होती. या मालिकेतही त्यांना सपाटून मार खावा लागला होता.
Web Title: ICC World Cup 2019: Pakistan all out by West Indies in 105 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.