लाहोर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी न्यूझीलंडने सर्वात आधी आपला संघ जाहीर केला. त्यापाठोपोठ शुक्रवारी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ( पीसीबी) वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचे संभाव्य 23 खेळाडूंची नावांची घोषणा केली आहे. हे खेळाडू 15 आणि 16 एप्रिलला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरूस्तीची चाचणी देणार आहेत आणि त्यानंतर 18 एप्रिलला अंतिम संघ जाहीर करण्यात येईल.
नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत
पाकिस्तान संघाला 5-0 असा दारूण पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे त्यांचे मनोबल नक्की खचले असेल, परंतु पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमद यांनी वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पाकिस्तानने 2017मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी ते उत्सुक आहेत.
वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 23 एप्रिलला पाक संघ इंग्लंडमध्ये दाखल होईल आणि तेथील स्थानिक संघांशी तीन सराव सामने खेळेल. त्यानंतर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात एक ट्वेंटी-20 आणि पाच वन डे सामन्यांची मालिका होणार आहे.
संभाव्य संघ : सर्फराज अहमद ( कर्णधार), अबीद अली, आसीफ अली, बाबर आझम, फहीम अश्रफ, फाखर झमान, हॅरीस सोहेल, हसन अली, इमाद वासीम, इमाम-उल-हक, जुनैद खान, मोहम्मद अब्बास, मोहम्मद आमीर, मोहम्मद हाफीज, मोहम्मद हस्नेन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, शोएब मलिक, उस्मान शिनवारी, यासीर शाह.
वर्ल्ड कपमधील पाकिस्तानचे सामने
24 मे - वि. अफगाणिस्तान ( सराव सामना)
26 मे - वि. बांगलादेश ( सराव सामना)
31 मे - वि. वेस्ट इंडिज, ट्रेंट ब्रिज
3 जून - वि. इंग्लंड, ट्रेंट ब्रिज
7 जून - वि. श्रीलंका, ब्रिस्टोल
12 जून - वि. ऑस्ट्रेलिया, टाँटन
16 जून - वि. भारत, ओल्ड ट्रेफर्ड
23 जून - वि. दक्षिण आफ्रिका, लॉर्ड्स
26 जून - वि. न्यूझीलंड, एडबॅस्टन
29 जून - वि. अफगाणिस्तान, हेडिंग्ले
5 जुलै - वि. बांगलादेश, लॉर्ड्स
Web Title: ICC World Cup 2019 : Pakistan cricket board announces probables 23 member squad for World Cup 2019
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.