ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप खेळायला आलाय की....? पाकिस्तानी मंत्र्याची टीका

ICC World Cup 2019: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवरून हे वादळ उठलं आहे. या ग्लोव्हजच्या चर्चेत पाकिस्तानी मंत्री फवाद चौधरी यांनी टीका केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 03:53 PM2019-06-07T15:53:36+5:302019-06-07T15:58:07+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Pakistan minister opines on MS Dhoni's wicketkeeping gloves with regimental dagger | ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप खेळायला आलाय की....? पाकिस्तानी मंत्र्याची टीका

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप खेळायला आलाय की....? पाकिस्तानी मंत्र्याची टीका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

साउदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्माच्या संयमी शतकाच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. पण, या सामन्यानंतर एक वादळ भारतीय संघावर घोंगावत आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवरून हे वादळ उठलं आहे. या ग्लोव्हजच्या चर्चेत पाकिस्तानी मंत्री फवाद चौधरी यांनी टीका केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) धोनीला ते ग्लोव्हज न घालण्यास सांगितले आहे. पण, बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनं धोनीची पाठराखण केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय समितीकडे तशी विनंती केली आहे. आयसीसीच्या या आदेशावर सोशल मीडियामधून जोरदार टीका सुरू आहे. #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे. 

पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री असलेल्या फवाद यांनी धोनीच्या मुद्यावर आपलं मत व्यक्त करताना भारतीय मीडियावरही टीका केली. ते म्हणाले,''धोनी इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळायला गेला आहे महाभारतासाठी नाही. भारतीय प्रसारमाध्यमांनी काय फालतू चर्चा सुरू केली आहे. भारतीय मीडियाला सीरिया, अफगाणिस्तान किंवा रवांदा येथे पाठवायला हवं.'' 

धोनीच्या ग्लोव्हजवरील भारतीय आर्मीचे चिन्ह आयसीसीने काढायला सांगितले
महेंद्रसिंग धोनी हा एक अनुभवी क्रिकेटपटू, दमदार फलंदाज आणि निष्णात यष्टीरक्षक आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेला (आयसीसी) मात्र धोनीची एक गोष्ट खटकली आहे. आयसीसीने बीसीसीआय धोनीच्या ग्लोव्जवरील एक चिन्ह काढण्याची विनंती केली आहे.  धोनीच्या ग्लोव्जवर असं कोणतं चिन्ह आहे, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. धोनीचे ग्लोव्ज हे हिरव्या रंगाचे आहेत. या ग्लोव्जवर पांढऱ्या रंगात एक चिन्ह आहे. हे चिन्ह भारतीय आर्मीतील असल्याचे म्हटले जात आहे. 

आयसीसीने याबाबत म्हटले आहे की, " आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळाडू जे पेहराव परीधान करताता किंवा जी उपकरण वापरतात त्याबाबत काही नियम आहेत. पेहराव आणि उपकरणांवर राजकीय किंवा धार्मिक गोष्टी असू नयेत, असे आम्हाला वाटते. याबाबत आम्ही बीसीसीआयला विनंती केली आहे."


Web Title: ICC World Cup 2019: Pakistan minister opines on MS Dhoni's wicketkeeping gloves with regimental dagger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.