लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आतापर्यंत विश्वचषकामध्ये भारत एकदाही पाकिस्तानकडून पराभूत झालेला नाही. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या निवड समितीचा अध्यक्ष आणि माजी कर्णधार इंझमाम उल हकने याबाबत एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा समाचार घेत भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने पाकिस्तानविरुद्धची विजयी परंपरा भारत कायम राखेल, असे म्हटले आहे.
ही बारावा विश्वचषक स्पर्धा आहे. आतापर्यंत विश्वचषकात पाकिस्तानला एकदाही भारताला पराभूत करता आलेले नाही. पाकिस्तानने १९९२ साली विश्वचषक जिंकला होता. त्यावेळीही भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते.
हरभजन म्हणाला की, " यावेळीही विश्वचषकात पाकिस्तान भारताला पराभूत करू शकत नाही. कारण दोन्ही संघांमध्ये अनुभव हा महत्वाचा मुद्दा आहे. पाकिस्तानपेक्षा भारताकडे जास्त अनुभव आहे. त्यामुळे हा सामना भारत जिंकेल, असे मला वाटते. जर पाकिस्तान भारताबरोबर १० सामने खेळला तर त्यापैकी ९ सामने भारतच जिंकेल."
पाकिस्तानला पहिल्याच सामन्या विंडीजने 7 विकेट राखून पराभूत केले. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आंद्रे रसेलने पाकिस्तानच्या सलामीवीरांना माघारी पाठवून विंडीजला मोठे यश मिळवून दिले. फाखर जमान व बाबर आजम यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. ओशाने थॉमसने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जेसन होल्डरनेही तीन विकेट घेतल्या. विंडीजने 105 धावांचे माफक लक्ष्य 13.4 षटकांत 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. ख्रिस गेलने 34 चेंडूंत 50 धावा चोपल्या. निकोलस पूरणने 19 चेंडूंत 34 धावांची नाबाद खेळी केली.
वर्ल्ड कप तर पाकिस्तानच जिंकणार, शाहिद आफ्रिदीला विश्वास!पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी शरणागती पत्करली, त्यानंतर संघावर आणि कर्णधार सर्फराज अहमदवर चहुबाजूंनी टीका झाली. पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनेही सर्फराजची चांगली कानउघाडणी केली. पण, पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी संघाच्या बचावासाठी पुढे आला आहे. त्याने हा संघ वर्ल्ड कप जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
सोमवारी यजमान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी सकारात्मक सुरुवात केली. सामन्यापूर्वी नेटमध्ये उसळी घेणाऱ्या चेंडूवर कसून सराव करणाऱ्या पाकच्या सलामीवीरांनी इंग्लंडच्या गोलंदाजांनी दमवले. इमाम उल हक आणि फखर जमान यांनी 11 षटकातं 73 धावा करताना संघाला दमदार सुरुवात करून दिली. या सामन्याचा अर्ध्या तासाचा खेळ झाल्यानंतर आफ्रिदीनं ट्विट केलं. तो म्हणाला,'' संघातील प्रत्येक खेळाडूच्या क्षमतेवर मला पूर्ण विश्वास आहे आणि ते हा वर्ल्ड कप जिंकतील, असे मला मनापासून वाटते. कर्णधार सर्फराजसह सर्व खेळाडूंना शुभेच्छा. इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून आत्मविश्वास कमवण्याचा प्रयत्न करा.''