लाहोर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील लाजीरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तानच्या संघाने वर्ल्ड कप चमूत दोन महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान संघाच्या निवड समितीचे प्रमुख इंजमाम उल हक यांनी सोमवारी पाकिस्तानचा 15 जणांचा अंतिम संघ जाहीर केला. पाकिस्तानने याआधी जाहीर केलेल्या संघातून जुनैद खान व फहीम अशरफ यांचे नाव वगळण्यात आले असून त्यांच्या जागी मोहम्मद आमीर व वाहब रियाज यांचा समावेश करण्यात आला आहे. निवड समितीच्या या निर्णयावर नारीज प्रकट करताना गोलंदाज जुनैदने तोंडावर काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला. त्याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
''इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत आमच्या गोलंदाजांना सपशेल अपयश आले. त्यामुळे वर्ल्ड कप संघात आमीर व रियाज या अनुभवी शिलेदारांना संधी देण्यात आली आहे. त्यांना न घेऊन आम्ही फार मोठी चूक केली असती,''अशी कबुली इंजमाम उल हकने दिली. पण, या निर्णयानंतर जुनैद वैतागला. त्याने पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करताना 76 वन डे सामन्यांत 110 विकेट घेतल्या. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दोन वन डे सामन्यांत त्याला खेळण्याची संधी मिळाली, परंतु त्याला दोनच विकेट घेता आल्या.
वर्ल्ड कप संघातून डावलल्यानंतर जुनैदने तोंडावर काळी पट्टी बांधलेला फोटो शेअर केला. त्यात त्यानं लिहीले की,'' मला काही बोलायचे नाही. सत्य नेहमी कटू असतं.'' पण, टीका झाल्यानंतर त्यानं हा फोटो डिलीट केला.
( ICC World Cup 2019 : पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघात मोठे बदल, अंतिम 15 शिलेदार जाहीर )
( ENGvPAK : इंग्लंडकडून पाकचा सुफडा साफ, पाचव्या वन डेतही लाजीरवाणा पराभव )
पाकिस्तानचा संघ : फखर जमान, इमाम-उल-हक, आसीफ अली, मोहम्मह हाफीज, बाबर आझम, सर्फराज अहमद ( कर्णधार), हॅरिस सोहेल, शोएब मलिक, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहिद आफ्रिदी, मोहम्मद आमीर, वाहब रियाज, मोहम्मद हसनैन.
Web Title: ICC World Cup 2019: Pakistani bowler Junaid Khan shares cryptic photo after being axed from World Cup squad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.