लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडच्या दिमाखदार विजयाने वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात झाली. वर्ल्ड कप स्पर्धेचा ज्वर हळुहळू वाढत चालला आहे. या स्पर्धेच्या कालावधीत मालामाल होण्यासाठी कंपन्याही पुढे सरसावल्या आहेत. क्रिकेटचाहत्यांनी क्रेझ लक्षात घेता वर्ल्ड कप सामन्यांचे थेट प्रक्षेपण काही अॅप्सवर केले जाते, परंतु त्यासाठी चाहत्यांच्या काही रक्कम मोजावी लागत आहे. पण, पाकिस्तानात क्रिकेट चाहते हे सामने कम्प्यूटर आणि लॅपटॉपवर फुकटात पाहत आहेत.
SportSala.com साईटवर हे सामने फुकटात पाहायला मिळत आहेत. येथे CWC19 TV या चॅनेल कॅटेगरीत हे सामने पाहता येत आहेत. त्यासाठी कोणताही शुल्क आकारण्यात येत नाही, परंतु हा सामना 15 सेकंदाच्या विलंबाने पाहावा लागत आहे. विशेष म्हणजे सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी कोणत्याही अकाऊंटची गरज नाही.
... म्हणून सर्व संघ पाकिस्तानला घाबरतात, सर्फराज अहमदचा दावाइंग्लंडच्या विजयाने सुरू झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत आज वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान हे दोन बेभरवशी संघ समोरासमोर येणार आहेत. या संघांची कामगिरी कशी होईल, याचा अंदाज भल्याभल्यांना बांधता येत नाही. त्यामुळे त्यांना बेभरवशी हा टॅग लागला आहे. पण, याच टॅगमुळे अन्य संघ आम्हाला घाबरत असल्याचा दावा पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने केला आहे.
सर्फराज म्हणाला,''बेभरवशी हा ठपका लागल्याचा आनंद आहे. त्यामुळे पाकिस्तानला अन्य संघ घाबरतात. पाकिस्तान संघ तसा घातकीच आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये आम्हाला बेभरवशी या टॅगसह दाखल होण्याचा आनंदच आहे. याने आम्हाला चांगली कामगिरी करण्यासाठी ऊर्जा मिळते.''
विंडीजचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने जाहीर केले 'BEST 12'पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप स्पर्धेत आपल्या सलामी लढतीत आज वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. इंग्लंडमध्ये दोन वर्षांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या चमकदार कामगिरीपासून प्रेरणा घेत पाक संघ वर्ल्ड कपमध्ये धडाक्यात सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील असतील. पाकिस्तान संघाला मागील 10 वन डे सामन्यांत विजय मिळवण्यात अपयश आले आहे. सराव सामन्यातही त्यांना अफगाणिस्तानविरुद्ध 3 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. पण, हे अपयश मागे सोडून नव्या दमाने वर्ल्ड कप स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी पाक संघ सज्ज झाला आहे. विंडीजविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानने त्यांचे अंतिम 12 शिलेदार जाहीर केले आहे.
पाकिस्तानचे BEST 12फाखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम, मोहम्मद हाफिज, सर्फराज अहमद, हॅरीस सोहैल, आसीफ अली, शाबाद खान, इमाद वासीम, मोहम्मद आमीर, वाहब रियाज, हसन अली.