लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : बाबर आझमचे शतक आणि शाहीन आफ्रिदीच्या भेदक माराच्या जोरावर पाकिस्तानने आपले आव्हान जीवंत ठेवले. न्यूझीलंडनेपाकिस्तानपुढे २३८ धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तानने बाबरचे शतक आणि हॅरिस सोहेलच्या अर्धशतकाच्या जोरावर हा सामना सहजपणे जिंकला.
न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. पाकिस्तानची ११ षटकांत २ बाद ४४ अशी अवस्था होती. पण त्यानंतर बाबर फलंदाजीला आला आणि त्याने सामन्याचा नूर बदलला. या सामन्यात आशियातील सर्वात जलद तीन हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बाबरने अव्वल स्थान पटकावले. बाबरला यावेळी सोहेलने चांगली साथ दिली.
शाहिन आफ्रिदीच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडची भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले होते. कारण शाहिनच्या तीन विकेट्समुळे न्यूझीलंडची ५ बाद ८३ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर जेम्स नीशाम आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांच्या दमदार फलंदाजीमुळे न्यूझीलंडला आव्हानात्मक धावसंख्या रचता आली.
संघ सामने कालावधीपाकिस्तान ७ ८ एप्रिल ते २४ एप्रिल २००२भारत ६ ६ जून ते ३० जून २०१३दक्षिण आफ्रिका ६ १९ मे ते १० जून १९९९दक्षिण आफ्रिका ६ २५ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २००४न्यूझीलंड ६ १ जून ते २^^६ जून २०१९
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळताना पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमने इतिहास रचला आहे. हा इतिहास रचताना बाबरने सचिन, विराट, धोनी यांनाही पिछाडीवर सोडले आहे. नेमका हा पराक्रम आहे तरी काय, जाणून घेऊ या...
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आशिया खंडातील सर्वात जलद तीन हजार धावा करणारा बाबर हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. हा विक्रम रचताना बाबरने सचिन, कोहली आणि धोनी यांना मागे टाकले आहे. बाबरने ६८ डावांमध्ये तीन हजार धावांचा पल्ला गाठला आहे. या ६८ डावांमध्ये बाबरने ९ शतक आणि १४ अर्धशतके लगावली आहेत. सध्याच्या घडीला बाबर हा ५०च्या सरासरीने धावा करत आहे.