लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : बांगलादेशने वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आपली धमक दाखवून दिली. बांगलादेशने दमदार फलंदाजी आणि चतूर गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. वन डे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारून बांगलादेशने इतिहास घडवला. बांगलादेशने हा सामना 21 धावांनी जिंकला. बांगलादेशच्या या अविश्वसनीय विजयाने वर्ल्ड कप स्पर्धेत खऱ्या अर्थाने चुरस निर्माण केली आहे. बांगलादेशच्या 330 धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेने 309 धावा केल्या.
बांगलादेशने या विजयासह गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे. वेस्ट इंडिजचा संघ +5.802 या नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ न्यूझीलंड ( +5.754), इंग्लंड ( +2.080) आणि ऑस्ट्रेलिया ( +1.860) हे अव्वल चौघांत आहे. दोन पराभवानंतरही दक्षिण आफ्रिका सातव्या स्थानी आहे.
फलंदाजांमध्ये आफ्रिकेच्या खेळाडूंचे वर्चस्व दिसत आहे. रॅसी व्हॅन डेर ड्यूसन आणि क्विंटन डी'कॉक यांच्या नावावर प्रत्येकी 91 धावा आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डेव्हीड वॉर्नर आणि इंग्लंडचा बेन स्टोक्स ( प्रत्येकी 89 धावा) यांचा क्रमांक आहे.
गोलंदाजांमध्ये वेस्ट इंडिजचा ओशाने थॉमस 4 विकेटसह अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 27 धावांत 4 विकेट घेतल्या होत्या. आफ्रिकेचा इम्रान ताहिरच्या नावावर 4 विकेट आहेत, पण त्याने दोन सामने खेळले आहेत.
Web Title: ICC World Cup 2019 Points Table, Standings, rankings, top run scorer, top wicket-taker after BAN vs SA
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.