ICC World Cup 2019 : जेव्हा अंपायर करतात ‘आउट’, विश्वचषकात खराब पंचगिरीचा अनुभव 

यंदाच्या विश्वचषकातील बऱ्याच गोष्टी स्मरणात राहण्यासारख्या आहेत. त्यात खराब पंचगिरीचाही समावेश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 03:52 PM2019-07-15T15:52:24+5:302019-07-15T16:01:37+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Poor Umpiring in ICC World Cup 2019 | ICC World Cup 2019 : जेव्हा अंपायर करतात ‘आउट’, विश्वचषकात खराब पंचगिरीचा अनुभव 

ICC World Cup 2019 : जेव्हा अंपायर करतात ‘आउट’, विश्वचषकात खराब पंचगिरीचा अनुभव 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- सचिन कोरडे  

यंदाच्या विश्वचषकातील बऱ्याच गोष्टी स्मरणात राहण्यासारख्या आहेत. त्यात खराब पंचगिरीचाही समावेश आहे. बऱ्याच सामन्यात पंचांनीच फलंदाजांना ‘आउट’ केल्याचे दिसून आले. त्यामुळे संघावर पराभवाचा वेळही आली. या विश्वचषकातील खराब पंचगिरी सुद्धा चाहत्यांच्या आठवणीत राहिल. इंग्लंड-न्यूझीलंड या फायनल सामन्यातही पंचाकडून काही चुका झाल्या.  


पहिली घटना :  सामन्यच्या तिसऱ्याच षटाकांत न्यूझीलंड फलंदाजी करत असताना पंचाकडून चुक झाली. वोक्सने तीसरा चेंडू फेकला. निकोलस हा स्टाईकवर होता. वोक्सने पायचितची अपील केली. चेंडू डाव्या बाजूने स्टॅम्पच्या वर दिसत असनाही पंच धर्मसेना यांनी काही क्षणात बोट वर केले. यावर निकोलसने रिव्हू घेतला. रिव्हूमध्ये तो नाबाद ठरला. 

दुसरी घटना : स्टाईकवर होता न्यूझीलंडचा कर्णधार विल्यम्सन. २३ वे षटक चालू होते. तेव्हा प्लंकेटने चौथा चेंडू फेकला. बॅटला चेंडू ‘टच’ करुन बटलरच्या हाती विसावला.  प्लंकेट जोराने अपील केली मात्र पंच धर्मसेना याने त्याला नाबाद दिले. यावर इंग्लंडने रिव्हू घेतला. तेव्हा ‘अल्ट्राएज’मध्ये चेंडू बॅटला लागून गेल्याचेस्पष्ट झाले. धर्मसेनाने निर्णय बदलला आणि विल्यमसन तंबूत परतला. 

तिसरी घटना : ३४ व्या षटकांत रॉस टेलर वूडच्या चेंडूवर खेळत होता. वूडचा चेंडू टेलर समजू शकला नाही. चेंडू सरळ पायावर आदळल्याने वूडने जोरात अपील केली यावर पंचानी टेलरला बाद घोषित केले. मात्र रिव्हू शिल्लक नसल्याने न्यूझीलंडला आपला मोठा फलंदाज गमावावा लागला. रिप्लेमध्ये टेलर नाबाद दिसत होता. चेंडूवर स्टॅम्पच्या वरुन गेला होता. 

असाचा अनुभव उपांत्य फेरीच्या सामन्यातही आला.  इंग्लंडच्या जेसन रॉय याला पंचांनी बाद केले. धर्मसेनानेच त्याचा ‘बळी’ घेतला होता. फायनलमध्ये सामन्यापूर्वी धर्मसेना-जेसन बातचीत करताना दिसले. धर्मसेना हा जेसनला माफीच मागत आहे की काय, असे वाटत होते.
भारतीय कर्णधार विराट कोहली हा सुद्धा खराब पंचगिरीचा बळी ठरला. न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये विराट कोहलीचा बळी पचांनीच घेतला. यावरही सोशल मिडियावर चर्चा रंगली आणि चाहत्यांनी जबरदस्त नाराजी व्यक्त केली.

Web Title: ICC World Cup 2019: Poor Umpiring in ICC World Cup 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.