मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतरही मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि साहाय्यक स्टाफच्या करारात 45 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पण, साहाय्यक प्रशिक्षक आणि फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार ठेवण्यात आली आहे. बांगर यांना अधिक चांगला रिझल्ट देता आला असता असे मत भारतीय क्रिकेट मंडळानं ( बीसीसीआय) व्यक्त केले.
इंग्लंडच्या खेळाडूनं उडवली विराट कोहलीची खिल्ली; म्हणाला...
गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करून दाखवली, तर क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर यांनीही त्यांची भूमिका चोख पार पाडली. पण, बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली फलंदाजांची कामगिरी चांगली झालेली नाही. बांगर यांना चौथ्या क्रमांकाचा पर्याय शोधताच आला नाही आणि त्यामुळेच भारताचे आव्हान संपुष्टात आले. IANS सोबत बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले की,''फलंदाजांची चुकलेली निवड यामुळे आम्हाला फटका बसला. बांगर यांना योग्य पर्याय निवडता आला नाही. खेळाडूंना आम्ही सर्वतोपरी सहकार्य केले आणि त्यांनीही चांगली कामगिरी केली. न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना वगळता.''
धोनीला चौथ्या क्रमांकावर न पाठवण्यामागे होतं हे कारण, शास्त्रींचा खुलासा
'' विजय शंकर वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेण्यापूर्वी, सर्व खेळाडू निवडीसाठी उपलब्ध असल्याचे बांगर सांगत होते. शंकरची दुखापत ही बांगरला माहित नसावी? संघातील अनेक खेळाडू माजी खेळाडूंकडे मार्गदर्शन करण्याची विनंती करत होते,'' असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.
वर्ल्ड कप स्पर्धा आता आयपीएल फॉरमॅटमध्ये खेळवा, विराट कोहलीचा पर्याय
संघाला गरज होती तेव्हाच अपयशी ठरलो, हिटमॅन रोहितला खंतन्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ज्याच्याकडून सर्वाधिक अपेक्षा होती तो रोहित शर्मा अवघ्या एका धावेवर माघारी परतला. रोहितनंही त्या सामन्यात आलेल्या अपयशाची खंत सोशल मीडियावर व्यक्त केली. या सामन्यानंतर रोहितनं ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला,''संघाला जेव्हा सर्वाधिक गरज होती तेव्हाच आम्हाला अपयश आलं. 30 मिनिटांच्या त्या अपयशानं आमच्या हातून जेतेपदाचा चषक उंचावण्याची संधी हिसकावून घेतली. माझं मन जाणतंय की किती वेदना होत आहेत ते, तुम्हालाही तशा होत असतील. संपूर्ण स्पर्धेत तुम्ही दिलेला पाठिंबा अविश्वसनीय होता. सर्वांचे आभार.''