नवी दिल्ली, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची आता उचलबांगडी होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यानंतर शास्त्री यांना मुख्य प्रशिक्षक पदावरून काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर सहाय्यक प्रशिक्षकांनाही डच्चू देण्यात येणार आहे. पण शास्त्री यांचे भविष्य 'देवा'च्या हाती असल्याचे म्हटले जात आहे. नेमकं घडणार तरी काय, याची उत्सुकता आता तुम्हाला लागली असेल.
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने ठेवल्या 'या' तीन अटी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. सध्या रवी शास्त्री हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. त्यामुळे बीसीसीआयनं नव्या प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले आहेत आणि या पदासाठी बीसीसीआयनं तीन अटी ठेवल्या आहेत.
वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघात बदलाचे वारे वाहत आहेत. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह साहाय्यक प्रशिक्षकांचा कार्यकाळ वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतच होता. परंतु, त्यांना आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या करारात वाढ न करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. त्यामुळेच बीसीसीआयनं मुख्य प्रशिक्षकासह, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक, फिजिओथेरेपिस्ट, तंदुरुस्ती प्रशिक्षक आणि प्रशासकीय व्यवस्थापक या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी 30 जुलै 2019, सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करायचे आहेत.
बीसीसीआयने आता प्रशिक्षकांच्या निवडीसाठी एक समिती बनवण्याचे ठरवले आहे. या समितीमध्ये भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव असणार आहे. कपिल यांच्या बरोबर अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांची या समितीमध्ये निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे रवी शास्त्री यांचे भवितव्य कपिल देव यांच्या हाती असल्याचे म्हटले जात आहे. पण या गोष्टीवर अजूनही शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. याबाबतेच वृत्त 'जागरण' या संकेतस्थळाने दिले आहे.
विश्वचषकातील पराभवानंतर निवड समिती अध्यक्षांचा राजीनामाविश्वचषकातील पराभव चाहत्यांसह साऱ्यांनाच चांगला जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आपण या पराभवासाठी कुठे ना कुठे तरी जबाबदार होतो, याची जाणीव निवड समिती अध्यक्षांना झाली आहे. त्यामुळेच विश्वचषकातील पराभवानंतर निवड समिती अध्यक्षांना राजीनामा दिला आहे.
प्रत्येक स्पर्धेसाठी निवड समिती संघाची बांधणी करत असतो. विश्वचषक ही मानाची स्पर्धा समजली जाते. जी प्रत्येक चार वर्षांनी खेळवली जाते. विश्वचषकासाठीही निवड समितीने पंधरा सदस्यीय संघ निवडला होता. पण आपण निवडलेला संघ विश्वचषकात पराभूत झाला, ही गोष्ट निवड समिती अध्यक्षांच्या मनाला बोचत आहे. त्यामुळेच त्यांनी निवड समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.