कोलंबो, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : क्रिकेट विश्वात बरेच क्रिकेडवेडे आहे आणि ते कधीही काहीही करू शकतात. या गोष्टीचा प्रत्यय विश्वचषक सुरु होत असताना आला आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला सलामीला पाठवावे, यासाठी एक क्रिकेटवेडा चक्क झाडावर चढलेला पाहायला मिळाला.
सध्याच्या घडीला इंग्लंडमध्ये विश्वचषक सुरु आहे. पण ही गोष्ट घडली आहे ती श्रीलंका संघाच्या बाबतीत. श्रीलंकेला पहिल्या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या सामन्यात श्रीलंकेला दोनशे धावांचा टप्पाही ओलांडता आला नव्हता. त्यानंतर एका क्रिकेटवेड्याने आपल्या हट्टासाठी हे कृत्य केले आहे.
श्रीलंकेची फलंदाजी चांगली होत नाही, असे या चाहत्याचे म्हणणे आहे. त्यासाठी श्रीलंकेच्या संघ व्यवस्थापनाने थिसारा परेराला सलामीला पाठवावे, अशी मागणी या चाहत्याने केली आहे. ही मागणी करत तो थेट झाडावरच चढला. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू रसेल ऑर्नल्डने या साऱ्या प्रकरणाचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
हा पाहा व्हिडीओ
श्रीलंकेला पहिल्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध १० गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. १९९६ च्या चॅम्पियन श्रीलंका संघाचा डाव प्रथम फलंदाजी करताना १३६ धावांत संपुष्टात आला. कर्णधार दिमुथ करुणारत्ने (नाबाद ५२) याचा अपवाद वगळता त्यांचे अन्य फलंदाज अपयशी ठरले.
दुसरीकडे अफगाणिस्तान पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला असला तरी त्यांनी २०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. लंकेविरुद्ध फलंदाज चांगली कामगिरी करतील, अशी अशा अफगाण कर्णधार गुलबदन नायबला आहे. गोलंदाजीमध्ये अफगाण क्रिकेटचा ‘पोस्टर बॉय’ राशिद खान, अष्टपैलू मोहम्मद नबी व हामिद हसन यांच्यावर लक्ष असेल.