लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : रोमहर्षक ठरलेल्या लढतीत यजमान इंग्लंडने सर्वाधिक चौकाराच्या मदतीनं न्यूझीलंडवर विजय मिळवून वर्ल्ड कप विजयाचा दुष्काळ संपवला. इंग्लंडने प्रथमच वर्ल्ड कप जिंकण्याचा मान पटकावला. यापूर्वी तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचूनही इंग्लंडला जेतेपदाचा चषक उंचावता आला नव्हता. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने ही ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. 44 वर्षांत इंग्लंडने प्रथमच वर्ल्ड कप जिंकला त्यामुळे त्यांच्या आनंदासमोर गगनही ठेंगणे वाटत होते. पण, वर्ल्ड कप हातात घेतल्यानंतर संघासोबत जल्लोष करण्याचे सोडून मोईन अली आणि आदिल रशीद यांनी सेलिब्रेशनपासून लांब राहणे पसंत केले. त्यांनी असे का केले?
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून 8 बाद 241 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ 241 धावांवरच तंबूत परतला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. यातही इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 15 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात न्यूझीलंडला 15 धावा करता आल्या. सर्वाधिक चौकार मारल्यामुळे इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. या सामन्यात बेन स्टोक्सने जीगरबाज खेळी केली. त्यानं 98 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार लगावून 84 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
जेतेपदाचा चषक उंचावल्यानंतर अली आणि रशीद काही काळासाठी संघापासून दूर गेले. अली आणि रशीद हे मुसलमान असल्यानं त्यांच्या धर्मात मद्य हे वर्जीत आहे. त्यामुळे चषक कर्णधाराच्या हातात येताच हे दोघेही तेथून निघून गेले. त्यानंतर संघावर शॅम्पेनचा वर्षाव झाला. हे सर्व थांबल्यानंतर दोघेही पुन्हा संघाच्ये सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले.
पाहा व्हिडीओ
जगज्जेत्या इंग्लंडचे खेळाडू विक्रमांचे धनी
विश्वचषकातील पहिल्यांदाच सुपर ओव्हरमधील अंतिम सामना. अशा काही लक्षवेधी गोष्टींसह विश्वचषकाचा इतिहास. पण, या वेळी या चषकावर नवे नाव कोरले गेले ते इंग्लंडचे. यजमान जगज्जेते झाले आणि या जगज्जेत्या काही खेळाडूंनी यंदा विक्रमांचे इमले रचले. इंग्लंडच्या माजी दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडीत काढण्यात आले. त्यावर एक नजर...
83 विश्वचषक सामने
विश्वचषकात सर्वाधिक धावा
556 जो रुट (२०१९)
सर्वाधिक बळी
20 जोफ्रा आर्चर (२०१९)
यापूर्वी : इयान बॉथम :
१६ बळी (१९९२)
मार्क वूड आणि क्रिस वोक्स यांनी अनुक्रमे १८ अणि १६ बळी घेतले.
यापूर्वी : ग्रॅहम गुच ४७१ धावा (१९८७)
जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स
यांनी स्पर्धेत अनुक्रमे ५३२ आणि
४६५ धावा केल्या.
यंदाची वैयक्तिक शतके
इंग्लंडकडून यंदा सात वैयक्तिक शतके ठोकली गेली. यापूर्वी : १९७५, १९८३, २००७ आणि २०१५ मध्ये प्रत्येकी दोन शतके होती. १९८७ ते २०१५ पर्यंतच्या आठ विश्वचषकांतील इंग्लंडकडून नोंदवलेली एकूण शतकांची संख्या ११ अशी आहे.
76 षटकारांचा विक्रम यंदा इंग्लंडकडून
यापूर्वी : २००७ मध्ये २२ षटकार
इयॉन मॉर्गनने या स्पर्धेत सर्वाधिक २२ षटकार ठोकले. यापूर्वी इंग्लंडकडून अशी कामगिरी कुणालाही करता आली नाही.अफगाणिस्तानविरुद्ध इग्लंडने २५ षटकार ठोकले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एखाद्या संघाविरुद्धचे हे सर्वाधिक षठकार ठरले.
Web Title: ICC World Cup 2019 : Reason why Moeen Ali, Adil Rashid walked off from England's World Cup celebrations?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.