Join us  

ICC World cup 2019 : ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक अ‍ॅलेक्स कॅरीचा पदार्पणातच विक्रम

अफगणिस्तानदरम्यानच्या  सामन्यात शनिवारी ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक अ‍ॅलेक्स कॅरी याने पाच गडी बाद करण्यात योगदान देत वर्ल्ड कप स्पर्धेतील पदार्पण दणक्यात साजरे केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 4:18 PM

Open in App

- ललित झांबरेअफगणिस्तानदरम्यानच्या  सामन्यात शनिवारी ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक अ‍ॅलेक्स कॅरी याने पाच गडी बाद करण्यात योगदान देत वर्ल्ड कप स्पर्धेतील पदार्पण दणक्यात साजरे केले. 19 वन डे सामने खेळलेल्या या 27 वर्षीय खेळाडूचा हा पहिलाच वर्ल्ड कप सामना होता. अफगणिस्तानविरुध्द कॅरीने चार झेल घेत आणि एक यष्टीचीत करत पाच गडी बाद करण्यात योगदान दिले. 

मात्र वर्ल्ड कप पदार्पणात त्याच्यापेक्षाही सरस कामगिरी पाकिस्तानच्या सर्फराझ अहमदने केली आहे. २०१५ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या डावात त्याने सहा गडी बाद करण्यात योगदान दिले होते, तर वेस्ट इंडिजच्या जिमी अ‍ॅडम्सने १९९६ च्या स्पर्धेत यष्टीमागे केनियाचे पाच गडी टिपले होते. 

कॅरी याने आज झझाई, नैब, नजिबुल्ला झाद्रान आणि दौलत झाद्रान यांचे झेल टिपले तर हशमतुल्ला शाहिदीला यष्टिचीत केले. वन डे क्रिकेटमध्ये एका डावात  पाच किंवा अधिक गडी बाद करण्याची ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षकाची ही विसावी वेळ होती तर वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियातर्फे ही यष्टिरक्षकाची  दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम गिलख्रिस्टने 2003 च्या स्पर्धेत नामिबियाविरुध्द यष्टिमागे सहा झेल टिपले होते. त्यानंतर आता कॅरीने पाच गडी बाद केले आहेत. 

वर्ल्ड कप स्पर्धेत पाच किंवा अधिक गडी  बाद करणारे यष्टीरक्षक 1) अ‍ॅडम गिलख्रिस्ट(ऑस्ट्रे,)- 6 झेल विरुध्द नामिबिया- 2003  2) सर्फराझ अहमद (पाक.)- 6 झेल विरूध्द द. आफ्रिका-  20153) सय्यद किरमाणी (भारत)- 5 झेल विरुध्द झिम्बाब्वे - 19834) जिमी अ‍ॅडम्स (वे.इं)- 5 (4 झेल, 1 यष्टीचित) विरुध्द केनिया- 19965) रशिद लतिफ (पाक)- 5 (4 झेल, 1 यष्टीचित) विरुध्द न्यूझीलंड- 19966) नयन मोंगिया (भारत)- 5 (4 झेल, 1 यष्टिचीत) विरुध्द झिम्बाब्वे-19997) रिडली जेकब (वे.इं.)- 5 झेल विरुध्द न्यूझीलंड- 19998) उमर अकमल (पाक)- 5 झेल विरुध्द झिम्बाब्वे - 2015 9) अ‍ॅलेक्स कॅरी -5 (4 झेल, 1 यष्टीचीत) विरुध्द अफगणिस्तान- 2019

टॅग्स :वर्ल्ड कप 2019आॅस्ट्रेलिया