Join us  

ICC World Cup 2019 : रिषभ पंतला भारतीय ड्रेसिंग रुममध्ये नो एंट्री, पण का...

जर पंतला भारतीय संघाने बोलावले आहे तर त्याला ड्रेसिंग रुममध्ये स्थान का देण्यात येणार नाही, हा तुम्हाला प्रश्न पडला असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 4:49 PM

Open in App

ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे तो यापुढे विश्वचषकात खेळणार की नाही, याबद्दल साशंकता आहे. शिखर जर खेळू शकणार नसेल तर संघात रिषभ पंतला स्थान देण्यात येऊ शकते. रिषभ पंत १६ जूनला मँचेस्टर येथे दाखल होणार आहे. पण पंतला मात्र भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये एंट्री देण्यात येणार नाही.

धवनच्या दुखापतीमुळेच पंतला इंग्लंडला बोलावले गेले आहे. पण जर पंतला भारतीय संघाने बोलावले आहे तर त्याला ड्रेसिंग रुममध्ये स्थान का देण्यात येणार नाही, हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. यासाठी सर्वात महत्वाचे कारण ठरला आहे एक नियम. हा नियम कोणता, ते आपण जाणून घेऊया.

आयसीसीचा नियम काय सांगतो...जोपर्यंत एखाद्या खेळाडूला कोणत्याही कारणास्तव तुम्ही संघातून बाहेर करत नाही, तोपर्यंत नवीन खेळाडू संघात येऊ शकत नाही. धवन दुखापतग्रस्त असला तरी त्याला संघातून बाहेर काढण्यात आलेले नाही. पंतला धवनचा पर्याय म्हणून इंग्लंडला बोलावण्यात आले असले तरी त्याला बीसीसीआयने अधिकृतरीत्या संघात दाखल केलेले नाही. त्यामुळे धवनला संघाबाहेर केल्यावरच पंत संघात येऊ शकतो. त्यामुळे जर पंत हा संघाचा भाग नसेल तर तो संघाबरोबर राहू शकत नाही. त्याचबरोबर संघाच्या ड्रेसिंग रुममध्येही त्याला प्रवेश देण्यात येऊ शकत नाही.

भारतासाठी गूड न्यूज; शिखर धवन 10 दिवसांमध्ये होऊ शकतो फिट

 सध्या भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे ते सलामीवीर शिखर धवनवर. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धवनला दुखापत झाली होती. त्यानंतर धवन विश्वचषकामध्ये खेळू शकत नाही, अशा अफवा पसरल्या होत्या. पण भारतीयांसाठी एक गूड न्यूज आली असून धवन 10 दिवसांमध्ये फिट होऊ शकतो.भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये गुरुवारी विश्वचषकातील सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आले होते. यावेळी बांगर यांनी ही माहिती दिली.

याबाबत बांगर म्हणाले की, " आम्ही धवनच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहोत. धवनच्या दुखापत लवकर बरी होईल, अशी आम्हाला आशा आहे. धवन 10-12 दिवसांमध्ये फिट होईल, असे आम्हाला वाटते. रिषभ पंत मँचेस्टर येथे काही वेळात दाखल होणार आहे."

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांविरुद्घचे सामने जिंकून विश्वचषक स्पर्धेत जोरदार सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला जबरदस्त धक्का बसला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत घणाघाती शतकी खेळी करणारा डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना हाताला झालेल्या दुखापतीमुळे धवनला तीन आठवडे संघाबाहेर राहावे लागणार आहे. 

टॅग्स :रिषभ पंतशिखर धवनवर्ल्ड कप 2019