ललित झांबरे : भारताच्या बुधवारच्या दक्षिण आफ्रिकेवरील विजयात सामनावीर रोहित शर्माचा सिंहाचा वाटा राहिला. भारताच्या 230 धावांपैकी निम्म्यापेक्षा अधिक धावा त्याने एकट्यानेच केल्या. त्याच्या नाबाद 122 धावा ह्या भारतीय धावसंख्येच्या 53.04 टक्के राहिल्या. रोहितचे हे विश्वचषकातील दुसरे शतक ठरले. यापूर्वी रोहितने 2015 साली झालेल्या विश्वचषकात शतक झळकावले होते.
भारताच्या पहिल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने दमदार फलंदाजीचा नमुना पेश केला. भारताच्या 'मिशन वर्ल्ड कप २०१९' चा 'शुभ आरंभ' झाला आहे. दक्षिण आफ्रिकेला ६ विकेट्सनी नमवून टीम इंडियानं विजयी सलामी दिली. या विजयाचा पाया बुमराह-चहल जोडीनं रचला होता आणि रोहित शर्माच्या शतकानं त्यावर कळस चढवला. वनडे करिअरमधील २३ वं शतक झळकावत रोहितनं 'दादा' सौरव गांगुलीला मागे टाकलंच, पण वर्ल्ड कपच्या रेकॉर्ड बुकमध्येही भारताचं नाव अव्वल स्थानी नेऊन ठेवलं.
रोहितने असे हे 'हिट' योगदान काही पहिल्यांदाच दिलेले नाही तर आपल्या वन डे सामन्यांच्या कारकिर्दीत त्याने पाचव्यांदा एकट्याने भारतीय धावसंख्येच्या निम्मेपेक्षा अधिक धावा केल्या आहेत आणि वन डे क्रिकेटमध्ये एवढ्या वेळा अशी कामगिरी करणारा तो एकटाच आहे. त्याच्यानंतर न्यूझीलंडच्या रॉस टेलरने तीन वेळा तर झिम्बाब्वेचा अँडी फ्लॉवर, दक्षिण आफ्रिकेचा हर्षल गिब्ज, आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर यांनी प्रत्येकी दोन वेळा एकट्यानेच आपल्या संघाच्या धावसंख्येच्या निम्मेपेक्षा अधिक धावा केल्या आहेत पण पाच वेळा अशी कामगिरी करणारा रोहित एकटाच.
अशाप्रकारे सर्वाधिक योगदानाचा विक्रम वेस्टइंडिजच्या विव्ह रिचर्डस् (69.48 टक्के) यांच्या नावावर आहे. त्यानंतर कपिल देव (65.78 टक्के) आणि रोहित शर्मा (65.34 टक्के) हे सर्वाधिक योगदानाच्या बाबतीत दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.
रोहितच्या सिंहाच्या योगदानाच्या पाच खेळी अशा...
रोहित संघ टक्के विरुध्द वर्ष 264 5-404 65.34 श्रीलंका 2014171 3-309 55.33 ऑस्ट्रेलिया 2016209 6-383 54.56 ऑस्ट्रेलिया 2013208 4-392 53.06 श्रीलंका 2017122 4-230 53.04 आफ्रिका 2019