ICC World Cup 2019: ये ‘शो हिट’ है! भारतासाठी मामला फिट है...

विश्वचषकात रोहितच्या फटकेबाजीची प्रतिस्पर्ध्यांना धडकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 09:57 PM2019-07-07T21:57:45+5:302019-07-07T21:59:45+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Rohit Sharma's 'Show Hit'! The case for India is fit ... | ICC World Cup 2019: ये ‘शो हिट’ है! भारतासाठी मामला फिट है...

ICC World Cup 2019: ये ‘शो हिट’ है! भारतासाठी मामला फिट है...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सचिन कोरडे, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : साखळी फेरीत टीम इंडियाने अव्वल स्थान गाठून या फेरीचा जबरदस्त शेवट केला आणि पुढचा इरादाही स्पष्ट केला. टीम इंडियाकडून विश्वचषकात काही विक्रमही रचले गेले. त्यात हिटमॅन रोहित शर्माने नोंदवलेले विक्रम अग्रस्थानी आहेत. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या या सलामीवीराने प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धडकी भरवली आहे. पाच शतके झळकाविणाऱ्या रोहितची कामगिरी अविस्मरणीय अशी आहे. 

India vs Sri Lanka, Latest News: Rohit Sharma again on top with half-century | India Vs Sri Lanka, Latest News : अर्धशतकासह रोहित शर्मा पुन्हा ठरला अव्वल
१) रोहितने पहिल्याच सामन्यात म्हजणे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकीय सुरुवात केली होती. १६ डावांत ६ शतके झळकावीत त्याने विश्वचषकात सर्वाधिक शतकांच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. सचिनला ६ शतकांसाठी ४५ डाव खेळावे लागले होते. 
२) सलग तीन शतके म्हणजे शतकांची हॅट्ट्रिक करणारा रोहित हा विराटनंतर दुसरा फलंदाज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराटने अशी कामगिरी गेल्या वर्षी केली होती. श्रीलंकेच्या संगकाराने २०१५ मध्ये सलग तीन शतके ठोकली होती. यंदा ती रोहितच्या नावावर आहेत. 

India vs Sri Lanka, Latest News: Rohit Sharma again on top with half-century | India Vs Sri Lanka, Latest News : अर्धशतकासह रोहित शर्मा पुन्हा ठरला अव्वल
३) विदेशी भूमीवर सर्वाधिक शतके नोंदवण्याच्या विक्रमाशी रोहितने बरोबरी साधली आहे. विदेशी भूमीवर सचिन तेंडुलकर (यूएई), सईद अन्वर (यूएई) आणि ए.बी. डिव्हिलियर्स (भारत) यांच्या नावावर प्रत्येकी ७ शतके आहेत. 
४) विश्वचषकात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणाºया विक्रमाशीही रोहितने बरोबरी साधली. यापूर्वी, अरविंद डिसिल्वा (१९९६), लान्स क्लुझनर (१९९९) आणि युवराज सिंग (२०११) यांनी सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवलेआहेत.
५) २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून कर्णधार कोहलीने ३४४९ धावा केल्या. त्यासुद्धा ८०.२० च्या सरासरीने. यामध्ये त्याच्या १४ शतकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे, रोहितने ३४३५ धावा फटकावल्या आहेत. त्याची सरासरी ६७.३५ अशी आहे. यामध्ये रोहितच्या १७ शतकांचा समावेश आहे. 

India vs Sri Lanka, Latest News: Rohit Sharma made history in World Cup | India Vs Sri Lanka, Latest News : रोहित शर्माने घडवला विश्वचषकात इतिहास
६) गेल्या ३६५ दिवसांच्या आकडेवारी नजर मारली तर रोहितच्या फलंदाजीचा अंदाज येईल. त्याने २०६३ धावा ७३.६७ च्या सरासरीने केल्या आहेत. यात त्याच्या दहा शतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेट इतिहासात ३६५ दिवसांत १० शतके ठोकण्याची कामगिरी कुणालाही करता आलेली नाही. त्यामुळे हा शो हिट आहे.

Web Title: ICC World Cup 2019: Rohit Sharma's 'Show Hit'! The case for India is fit ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.