- सौरव गांगुली लिहितात...विश्वचषकात अपराजित असलेल्या भारताचे इंग्लंडविरुद्ध काय हाल झाले... हा पराभव म्हणजे सावरण्याचे संकेत मिळाले असे समजा. बलाढ्य मानल्या जाणारा आणि फॉर्ममध्ये असलेल्या भारताला स्पर्धेत जिंकायचे असेल, तर पुन्हा जोमाने खेळावेच लागेल. भारत उपांत्य फेरीत दाखल होईलही, या प्रकारात तुमचे गुण बाद फेरीत दखलपात्र ठरत नाही, हे सर्व समजू शकतो तथापि उपांत्य फेरी गाठणारे सर्व चारही संघ नेमके ‘त्या’ दिवशी कसे खेळतील यावर त्यांची वाटचाल विसंबून असणार आहे. २०११ च्या विश्वचषकात भारताची सुरुवात साखळीत द. आफ्रिकेविरुद्ध पराभवाने झाली. तरीही मुसंडी मारून दणदणीत कामगिरीसह हा संघ जेतेपदाचा मानकरी ठरला. अशी कामगिरी करणारा भारत पहिला संघ ठरला होता.भारताविरुद्धचा सामना इंग्लंडसाठी महत्त्वपूर्ण होता. त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत जी प्रतिष्ठा स्थापन केली, त्या प्रतिष्ठेनुरूप काल खेळही केला. जेसन रॉय याचे पुनरागमन यजमानांसाठी फलदायी ठरले. रॉय- बेयरेस्टो यांच्या खेळीमुळेच सामना भारताच्या हातून निसटला. बुमराह आणि शमी यांचा मारा सकारात्मक खेळून दोघांनी फिरकीपटूंवर दडपण वाढवले होते. या दोघांनी जे केले ते अन्य संघातील खेळाडूंना अद्याप जमलेले नाही.भारताने आता हा पराभव विसरला पाहिजे. विश्वचषकात पहिल्यांदा प्रतिस्पर्धी संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम क्षेत्ररक्षण करण्यास सांगितले. हे आव्हान याआधी मिळाले असल्याने त्यात कोहली अपयशी ठरला. भविष्यात धावांचा पाठलाग करताना डावपेच बदलावे लागतील,हा बोध कोहलीने घेतला असावा.विराट व रोहित हेच बऱ्यापैकी खेळले. तथापि पहिल्या दहा षटकात अधिक धावा निघायला हव्या होत्या. मधल्या फळीचे अपयश हा चर्चेचा विषय आहे, पण माझ्यामते मधली फळी चांगलीच आहे. पंतमुळे धावांचा पाठलाग करण्याची संघाची क्षमता वाढली. अखेरच्या सात षटकात चेंडू आणि धावा यांचे समीकरण बिघडले. प्लंकेट व आर्चर यांनी फलंदाजांना फटकेबाजीची संधी नाकारल्याने धोनी आणि जाधव यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. सामना संपल्यानंतर पत्रकारांपुढे कोहलीची नाराजी स्पष्टपणे झळकत होती. नाराजी व्यक्त करणे हे त्याच्या अधिकारकक्षेत येते, हे मान्य करायला हवे. (गेमप्लान)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019: रॉय- बेयरेस्टो यांच्या खेळीमुळेच फिरला सामना
ICC World Cup 2019: रॉय- बेयरेस्टो यांच्या खेळीमुळेच फिरला सामना
भारताविरुद्धचा सामना इंग्लंडसाठी महत्त्वपूर्ण होता. त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत जी प्रतिष्ठा स्थापन केली, त्या प्रतिष्ठेनुरूप काल खेळही केला.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 12:56 AM