मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील पहिल्या सामना गाजला तो 'नो बॉल' प्रकरणामुळे.... या सामन्यात लसिथ मलिंगाने टाकलेला अखेरचा चेंडू नो बॉल असूनही पंचांनी तो दिला नाही आणि त्यामुळे बंगळुरूला तो सामना गमवावा लागला. नो बॉल न देण्याची चूक करणारे पंच सुंदराम रवी यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली. त्याच रवी यांनी आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पंचगिरी करण्याची संधी मिळणार आहे. आयसीसीने शुक्रवारी जाहीर केलेल्या 22 सदस्यीय पंचांमध्ये भारताच्या एकमेव पंचांना संधी देण्यात आलेली आहे आणि ते म्हणजे एस रवी.
मुंबई इंडियन्सने अखेरच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर विजय मिळवला. पण हा अखेरचा चेंडू नो बॉल असल्याचे सामन्यानंतर पाहायला मिळाले. हा नो बॉल असल्याचे बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला समजला आणि सामन्यानंतर कोहली चांगलाच वैतागेलला पाहायला मिळाला. बंगळुरुला अखेरच्या चेंडूवर सात धावांची गरज होती. पण मलिंगाने या अखेरच्या चेंडूवर फक्त एकच धाव दिली. जर या चेंडूवर षटकार बसला असता तर सामना बरोबरीत सुटला असता आणि त्यानंतर एका षटकाचा सामना खेळवला गेला असता. पण अखेरच्या चेंडूवर एक धाव मिळाल्यावर मुंबईने विजयोत्सव साजरा केला. पण काही वेळातच हा अखेरचा चेंडू नो बॉल असल्याचे पाहायला मिळाले. कोहलीने सामना झाल्यानंतर मैदानात त्या नो बॉलविषयी विचारणा केली. पण तोपर्यंत सामन्याचा निकाल लागला होता आणि बंगळुरुचा पराभव झालेला होता.
मॅच रेफरी - ख्रिस ब्रॉड, डेव्हिड बून, अँडी पिक्रॉफ्ट, जेफ क्रो, रंजन मदुगल्ले, रिची रिचर्डसन
पंच - अलीम दार, कुमार धर्मसेना, मरैस इरास्मुस, ख्रिस जॅफनी, इयान गौल्ड, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबोरौघ, निगेल लाँग, ब्रुस ओक्सेनफोर्ड, रवी सुंदराम, पॉल रैफेल, रॉड टकर, जोएल विल्सन, मिचेल गौफ, रुचिरा पल्लीयागुरुग, पॉल विल्सन.
Web Title: ICC World Cup 2019 : S Ravi chosen as only Indian umpire for the World Cup, Ian Gould to retire after the event
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.