लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना अखेरच्या साखळी फेरीत बांगलादेशवर मोठ्या फरकाने ( अशक्यप्राय) विजय मिळवावा लागणार आहे. न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्ध 119 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांचे 9 सामन्यांत 11 गुण आहेत, पण मोठ्या फरकाने पराभूत झाल्यानंतरही त्यांचा नेट रन रेट पाकिस्तानच्या तुलनेत (+0.175) सरस आहे तर पाकिस्तानचा नेट रन रेट (-0.792) आहे. त्यामुळे पाकिस्तानला केवळ विजय पुरेसा नाही. उपांत्य फेरीच्या आशा संपुष्टात आल्या असल्या तर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद प्रचंड आशावादी आहे. अल्लाहची मेहरबानी झाली तर आम्ही 500 धावाही चोपू, असा दावा त्याने केला आहे.
एका चेंडूवर 286 धावा बनू शकतात, मग पाकिस्तान उपांत्य फेरीत का पोहचू शकत नाही?तो म्हणाला,'' अखेरच्या साखळी सामन्यात दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याचा आमचा प्रयत्न असेल. सद्यस्थितीत ते शक्य वाटत नसले तरी अल्लाहने मदत केल्यास काहीतरी चमत्कार होऊ शकतो. 600, 500, 400 धावा चोपून प्रतिस्पर्धी संघाला 50 धावांचा आत बाद केल्यास आम्ही 316 धावांनी विजय मिळवू शकतो. याचा वास्तविक विचार केल्यास आणि प्रयत्न केल्यास हे शक्य आहे. या सामन्यात आम्ही 500 धावा करण्याचा पूर्ण प्रयत्न करू.''
ICC World Cup 2019 : तरच पाकिस्तानचा होऊ शकतो सेमीफायनलमध्ये प्रवेश, हे आहे समीकरण
ICC World Cup 2019 : अख्तरने यांच्यावर फोडले पाकिस्तानच्या स्पर्धेबाहेर होण्याचे खापर!
दुसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केल्यास त्यांना 50 षटकांमध्ये 400 धावा कराव्या लागतील. त्यानंतर बांगलादेशला 84 धावांनी गुंडाळून 316 धावांनी विजय मिळवावा लागेल. असा विजय मिळवला तरच पाकिस्तानचा रनरेट हा न्यूझीलंडपेक्षा अधिक होईल आणि पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठता येईल.
ICC World Cup 2019 : देव करो अन् बांगलादेश संघावर वीज पडो, पाकच्या माजी खेळाडूचे अजब साकडे
तिसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 450 धावा फटकवाव्या लागतील. त्यानंतर बांगलादेशला 129 धावांवर गुंडाळावे लागेल. म्हणजेच 321 धावांनी विजय मिळवल्यास पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.
ICC World Cup 2019 : पाकिस्तानचा संघ डरपोक; मिळाला घरचा अहेर...
पण, जर बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यास, एकही चेंडू न खेळता पाकिस्तान स्पर्धेबाहेर फेकला जाईल.