नवी दिल्ली : भारताच्या विश्वचषकाच्या संघाबाबत अजूनही बरीच चर्चा सुरु आहे. कोणला वगळले, कोणला स्थान मिळाले, कोणाला स्थान मिळायला हवे होते, या चर्चा अजूनही सुरुच आहेत. पण सर्वात रंगतदार चर्चा एका गोष्टीवर होत आहे आणि ती म्हणजे, ज्या खेळाडूंनी एकही विश्वचषकाचा सामना खेळला नाही त्यांनी वर्ल्ड कपचा संघ निवडल्याची चर्चा सुरु आहे. कारण निवड समितीच्या एकाही सदस्याने विश्वचषकाचा एकही सामना खेळलेला नसल्याचेच पाहायला मिळाले आहे.
निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी आतापर्यंत 17 वनडे सामने खेळले आहेत. त्यानंतर देवांग गांधी 4, जतीन परांजपे 4, शरणदीप सिंग 3 आणि गगन खोडाने 2 वनडे सामने खेळले आहेत. निवड समितीमधील खोडा आणि परांजपे यांच्या नावावर एकही कसोटी सामना नाही. त्याचबरोबर या निवड समितीमधील एकाही सदस्याने विश्वचषकातील सामने खेळलेला नाही. त्यामुळे ही निवड समिती किती योग्य निर्णय घेऊ शकेल, असे काही जणांचे म्हणणे आहे. दुसरीकडे काही जणांनी याबाबत सकारात्मक पवित्रा घेतला आहे. काही खेळाडू म्हणून महान असले तरी ते अन्य गोष्टींमध्येही महान असतात असे नाही किंवा एखादा चांगला खेळाडू नसला तरी तो अन्य बाबींमध्ये चांगला असू शकतो. त्यामुळे या गोष्टीवर चर्चा करणे योग्य नसल्याचे काही जणांना वाटते.
आता थ्री-डी गॉगल घालून विश्वचषक पाहणार, अंबाती रायुडूची खरमरीत टीकाभारताचा विश्वचषकासाठी पंधरा सदस्यीय संघ जाहीर झाला. या संभाव्य संघात चौथ्या स्थानासाठी अंबाती रायुडूला संधी मिळेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण निवड समितीने मात्र अंबाती रायुडूला डावलले. रायुडू या गोष्टीमुळे निराश झाला आहे. या निवडीवर रायुडूने ट्विटरवरून खरमरीत टीका केली आहे.
निवड समितीने चौथ्या स्थानासाठी केदार जाधव आणि विजय शंकर यांची निवड केली आहे. रायुडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. रायुडूच्या तुलने कमी अनुभव असूनही केदार आणि विजय शंकर यांची चौथ्या स्थानावर निवड करण्यात आल्याने रायुडू नाराज झाला आहे. विजय शंकर आतापर्यंत फक्त 9 एकदिवसीय सामने खेळला असला तरी त्याला संघात घेत त्यांनी रायुडूचा पत्ता कापला आहे.
संघात निवड झाल्यानंतर काही वेळ रायुडू हा शांत होता. पण आज दुपारी मात्र त्याने ट्विटरच्या माध्यमातून निवड समितीवर टीका केली आहे. टीका करताना रायुडू म्हणाला की, " आता थ्री-डी गॉगल घालून मी विश्वचषक पाहणार आहे." ही टीका करताना रायुडूला सांगायाचे आहे की, विश्वचषकातील संघात माझी निवड केली नाही. पण मी विश्वचषकात खेळतो आहे, हा आभास निर्माण करण्यासाठी मी आता थ्री-डी गॉगल घालून विश्वचषक पाहणार असल्याचे रायुडूने या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.
हे पाहा रायुडूचे ट्विट