लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शकिब अल हसनची अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्यात शकिबने अर्धशतक तर झळकावलेच, पण त्याचबरोबर अफगाणिस्तानचा अर्धा संघही गारद केला. पण क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.
बांगलादेशने अफगाणिस्तानवर 62 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 262 धावा केल्या. यावेळी शकिबने 51 धावांची खेळी साकारली, तर मुशफिकर रहिमने 83 धावांची सर्वाधिक खेळी साकारली. या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला तो शकिब अल हसन.
आतापर्यंत क्रिकेट विश्वचषकात अर्धशतक आणि पाच बळी मिळवणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. असा पराक्रम करणारा पहिला खेळाडू आहे भारताचा युवराज सिंग. युवराजने 2011 साली झालेल्या विश्वचषकात आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक आणि पाच बळी मिळवण्याची किमया साधली होती.
तुमको लेकर डूबेंगे... म्हणणारे स्वत:च बुडाले, बांगलादेशचा अफगाणिस्तानवर विजयअफगाणिस्तानचा कर्णधार बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातपूर्वी हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डूबेंगे... असे म्हणाला होता. पण या सामन्यात तुमको लेकर डूबेंगे... म्हणणारे स्वत:च बुडाल्याचे पाहायला मिळाले. कारण या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानवर 62 धावांनी विजय मिळवला. या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला तो शकिब अल हसन. कारण या सामन्यात शकिबने अर्धशतक तर झळकावलेच, पण त्याचबरोबर अफगाणिस्तानचा अर्धा संघही गारद केला.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 262 धावा केल्या. यावेळी शकिबने 51 धावांची खेळी साकारली, तर मुशफिकर रहिमने 83 धावांची सर्वाधिक खेळी साकारली. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रेहमानने तीन बळी मिळवले. बांगलादेशच्या 262 धावांचा यशस्वी पाठलाग अफगाणिस्तानला करता आला नाही. बांगलादेशच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव 200 धावांमध्येच आटोपला.अफगाणिस्तानचा कर्णधार म्हणतो; हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डूबेंगे...अफगाणिस्तानने शनिवारी भारतासारख्या दिग्गज संघांला कडवी झुंज दिली होती. भारताविरुद्धच्या सामन्यानंतर अफगाणिस्तानचे मनोबल कमालीचे उंचावलेले दिसत आहे. कारण त्यांनी एका प्रतिस्पर्धी संघाला चांगलीच वॉर्निंग दिली आहे. ही वॉर्निंग देताना अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नईबने, हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डूबेंगे... या ओळींचाही वापर केला आहे.
अफगाणिस्तानचा यापुढील सामना बांगलादेशबरोबर होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परीषद झाली होती. या परिषदेला अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नईब आला होता. या पत्रकार परिषदेमध्ये त्याने बांगलादेश वॉर्निंग दिल्याचे पाहायला मिळाले आहे. या परिषदेमध्ये गुलबदिनने बांगलादेशबाबत बोलताना हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डूबेंगे... या ओळींचा वापर केला.
भारताने सामना आणि अफगाणिस्तानने मनं जिंकलीभारतासारख्या दिग्गज संघाला अफगाणिस्तानसारख्या अनुनभवी संघांचे चांगलेच झुंजवले. अखेरच्या षटकापर्यंत हा सामना चांगलाच रंगला. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत किल्ला लढवला खरा, पण त्यांना विजय मात्र मिळवता आला नाही. भारताने अफगाणिस्तानपुढे २२५ धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग अफगाणिस्तानला करता आला नाही.