लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे तीन आठवड्यांच्या विश्रांतीलाचा सल्ला देण्यात आला आहे. भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला हा मोठा धक्का मानला जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धवनने शतकी खेळी करत विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. पण, त्याच सामन्यात अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरलाच नाही. त्याची दुखापत लवकरात लवकर बरी होईल असा विश्वास संघ व्यवस्थापनासह कर्णधार विराट कोहलीनंही व्यक्त केला आहे. धवनही दुखापतीतून सावरण्यासाठी कसून मेहनत घेत आहे. दुखापततही तो स्वस्थ बसलेला नाही, त्यानं जिममध्ये भरपूर घाम गाळला. त्याचा या जिममधील वर्क आऊटचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
शिखर धवन 'या' सामन्यातून कमबॅक करणार, कॅप्टन कोहलीकडून मोठी अपडेटऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत झालेल्या दुखापतीमुळे तीन आठवडे क्रिकेटपासून दूरावलेला शिखर धवन वर्ल्ड कप स्पर्धेत कमबॅक करण्यासाठी सज्ज होत आहे. पॅट कमिन्सने टाकलेल्या चेंडूवर भारताच्या सलामीवीराच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. तरीही त्यानं जिद्दीनं खेळ करत 117 धावा चोपून काढल्या होत्या. मात्र, दुखापतीमुळे तो क्षेत्ररक्षणाला आला नाही. तो दुखापतीतून सावरत असून 10-12 दिवसांत तो कमबॅक करेल असा विश्वास आहे.
नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर तो संघांसोबत सराव सत्रातही दिसला होता. भारत-न्यूझीलंड हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना समाना एक गुण देण्यात आले. या सामन्यानंतर कॅप्टन विराट कोहलीनं धवनच्या दुखापतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली.''त्याच्या अंगठ्याला प्लास्टर करण्यात आले आहे आणि पुढीत काही दिवस ते तसेच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या दुखापतीची चिकिस्ता करण्यात येईल. आशा करतो की तो साखळी फेरीच्या मध्यंतराच्या सत्रात पुनरागमन करेल आणि उपांत्य फेरीचा सामनाही खेळेल.''
ESPNcricinfoच्या हाती लागलेल्या माहितीनुसार साखळी फेरीच्या अखेरच्या टप्प्यात धवन पुनरागमन करेल. त्यामुळे तो यजमान इंग्लंडविरुद्ध 30 जूनला एडबॅस्टन येथे होणाऱ्या लढतीत खेळण्याची शक्यता आहे