मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : जेतेपदाचा प्रबळ दावेदार भारतीय संघाचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास उपांत्य फेरीत संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून त्यांना 18 धावांनी हार पत्करावी लागली. भारताच्या या पराभवावर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं प्रतिक्रिया दिली. तो काय म्हणाला जाणून घेऊया...
सुरुवातीच्या 45 मिनिटांच्या निशाराजनक कामगिरीचा भारतीय संघाला मोठा फटका बसला. भारताचे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या 5 धावांत तंबूत परतले होते. हार्दिक पांड्या व रिषभ पंत यांनी संघर्ष केला, परंतु अनुभवाची उणीव आणि अतीघाई त्यांना नडली. भारताने सहा फलंदाज 96 धावांत तंबूत परतले होते. भारताचा पराभव हा डोळ्यासमोरच दिसत होता, परंतु महेंद्रसिंग धोनी व रवींद्र जडेजा यांनी 116 धावांची भागीदारी करून पुन्हा आशा पल्लवीत केल्या. पण, 48व्या षटकात जडेजा बाद झाला आणि त्यानंतर धोनी धावबाद होऊन माघारी परतला. त्यामुळे भारताला 18 धावांनी पराभव पत्करावा लागला.
वर्ल्ड कप स्पर्धेतील धक्कादायक निकाल, शोएब अख्तर
शोएब अख्तर म्हणाला,''भारतीय फलंदाजांनी निराश केलं. अंतिम फेरीत जाण्यासाठी त्यांच्याकडून अपेक्षित खेळ झाला नाही. जडेजा व धोनी यांच्या खेळीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. त्यांनी भारताला जवळपास विजय मिळवूनच दिला होता. वर्ल्ड कपमधील हा धक्कादायक निकाल म्हणावा लागेल.''
Video : विराट कोहली अन् रवी शास्त्री यांच्यात तू तू मै मै; पंत बाद होताच कॅप्टन भडकला, पण का?
न्यूझीलंडच्या संघाने उत्तम सांघिक खेळाचा नजराणा पेश करताना भारतीय संघाला हार मानण्यास भाग पाडले. 240 या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांची किवी गोलंदाजांसमोर त्रेधातिरपीट उडाली. भारताचे सलामीचे तीन फलंदाज अवघ्या 5 धावांवर माघारी परतले. वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील ही एखाद्या संघाची सर्वात लाजीरवाणी कामगिरी ठरली. या सामन्यादरम्यान कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यात तू तू मै मै झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Web Title: ICC World Cup 2019 : Shoaib Akhar thinks India didn’t bat well in the semis against New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.