लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : अफगाणिस्तानविरुद्धच्या संथ खेळीमुळे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर सातत्यानं टीका होत आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानेही धोनीच्या 52 चेंडूवरील 28 धावांच्या खेळीवर नाराजी प्रकट केली होती. रशीद खानच्या गोलंदाजीवर धोनी यष्टिचीत झाला होता. या सामन्यात भारताला विजयासाठी घाम गाळावा लागला होता. 224 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्ताने 213 धावांपर्यंत मजल मारली होती. मोहम्मद शमीनं अखेरच्या षटकात हॅटट्रिक घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.
( ICC World Cup 2019 : सचिन तू वर्ल्ड कप जिंकलास तो धोनीमुळेच, नेटिझन्सकडून तेंडुलकर ट्रोल!)
अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत 26व्या षटकात धोनी फलंदाजीला आला. पण, त्याचा खेळ इतका संथ होता की चाहतेही त्याच्या बाद होण्याची प्रतीक्षा पाहू लागले. धोनीनं या सामन्यात 52 चेंडूंत 28 धावा केल्या. मधल्याफळीत धोनी व जाधव यांनी 57 धावांची भागीदारी केली, परंतु धावांचा वेग फारच संथ होता. त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सामन्यानंतर धोनीवर भरपूर टीका झाली. पण, त्याच्या मदतीला माजी कर्णधार सौरव गांगुली धावला आहे. निराशाजनक कामगिरीनंतरही 37 वर्षीय धोनी हा सर्वोत्तम खेळाडूच राहणार आहे. पुढील सामन्यांत तो त्याच्या टीकाकारांची तोंड बंद करेल, असा विश्वास गांगुलीनं व्यक्त केला.
गांगुली म्हणाला,''एका सामन्यावरून धोनीला पारखू नका. तो एक चांगला फलंदाज आहे आणि पुढील सामन्यांत तो हे सिद्ध करून दाखवेल. ''
यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत धोनीला फलंदाजी करण्याची पुरेशी संधी आतापर्यंत मिळालेली नाही. त्याने चार डावांत 90 धावा केल्या आहेत. भारतीय संघ सध्या पाच सामन्यांत चार विजय व एक अनिर्णीत निकालाची नोंद करून 9 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. बुधवारी त्यांच्यासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान आहे.
... ती रात्र विसरणे शक्य नाहीकुठलाही क्रीडा सोहळा चाहत्यांविना अपूर्णच असतो. चाहते म्हणजे स्पर्धेचा अविभाज्य भागच आहे असे नाही, तर कुठल्याही खेळाडूसाठी मैदानाबाहेरचे ते प्रेरणास्त्रोताचे केंद्र असते. मॅराडोना, पेले, फेडरर, तेंडुलकर किंवा कोहली या दिग्गजांना सर्वप्रथम पावती मिळते ती चाहत्यांकडून. त्यांच्यामुळेच खेळाडूंना चमकदार कामगिरीसाठी एक्स्ट्रा बुस्ट मिळते.
२ एप्रिल २०११ ची ती रात्र अद्याप माझ्या स्मरणात आहे. भारताने वानखेडे स्टेडियममध्ये विश्वविजेतेपदाला गवसणी घातली होती. मी माझे काम आटोपून हॉटेलमध्ये परतत होतो. त्यावेळी मार्गावर जनसमुदाय दिसत होता. लोकांच्या गर्दीतून मार्ग कसा काढावा हे सुचत नव्हते. कार पुढे सरकणे कठीण होते. त्यावेळी माझ्यासह प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेताही प्रवास करीत होते. त्यावेळी चाहत्यांना कळले की आम्ही दोघे कारमध्ये आहोत त्यावेळी त्यांच्या जल्लोषाला अतिरिक्त उधाण आले. ते कारच्या टपावर चढून आनंद साजरा करत होते. एकवेळ तर मला वाटले की मी माझे सकाळचे विमान नक्कीच मिस करेल कारण कार इंचभरही पुढे सरकत नव्हती. नशिबाने कारचालकाने एका छोट्या हॉटेलमध्ये पोहचवले. अन्य दिवशी वानखेडे स्टेडियमपासून चालत गेलो असतो तरी हा केवळ पाच मिनिटांचा रस्ता होता. त्या हॉटेलमधून मी मागच्या दाराने विमानतळापर्यंत पोहोचलो. या स्मृती मात्र जीवनभर माझ्यासोबत असतील.
भारतीय संघ खेळत असताना चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो, याचा मी साक्षीदार आहे. मला २००२ ची नेटवेस्ट फायनल आठवते. इंग्लंड संघ क्रिकेटच्या पंढरीत पराभूत झाला होता. २०१५ मध्ये मेलबोर्नमध्ये भारतीय संघ द. आफ्रिकेविरुद्ध खेळत होता. त्यावेळी पूर्ण स्टेडियम निळ्या रंगाने व्यापले होते. इंग्लंडमध्ये २०१९ मध्येही तेच दृश्य होते. मँचेस्टरमध्येही निळ्या रंगाचे वर्चस्व बघितल्यानंतर आश्चर्य वाटले. कारण यॉर्कशायरमध्ये अनेक पाकिस्तानी नागरिक राहतात.
अनेकदा मला हा प्रश्न विचारण्यात येतो की जगात कुठल्याही देशात भारतीय चाहत्यांची संख्या अधिक का असते. सर्वप्रथम भारतीयांमध्ये क्रिकेटबाबत अधिक पॅशन आहे. जगभर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांच्यासाठी विविध स्थळांवर जाणे अन्य देशांच्या नागरिकांच्या तुलनेत सोेपे आहे.