लंडन : विश्वकप स्पर्धेच्या सलामी लढतीत यजमान इंग्लंडविरुद्ध मोठ्या फरकाने मिळालेल्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिका संघ रविवारी येथे दुसऱ्या लढतीत बांगलादेशविरुद्ध विजय मिळवण्यास उत्सुक आहे. दक्षिण आफ्रिका संघासाठी स्पर्धेची ही दुसरी लढत आहे तर बांगलादेश संघ या लढतीने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. दक्षिण आफ्रिका संघाला गुुरुवारी इंग्लंडविरुद्ध १०४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. दक्षिण आफ्रिका संघाने या लढतीत इंग्लंडला ८ बाद ३११ धावात रोखले, पण आर्चरच्या भेदक माºयाचे संघाकडे कुठले उत्तर नव्हते. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा डाव २०७ धावांत गुंडाळला.
घाबरू नका : ड्युप्लेसिसदक्षिण आफ्रिका संघाकडे आता ओव्हलवर पुनरागमन करण्याची संधी आहे. संघाला घाबरण्याची गरज नाही, असे कर्णधार ड्युप्लेसिसने म्हटले आहे. ड्युप्लेसिस म्हणाला, ‘१० देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक संघाला ९ सामने खेळण्याची संधी मिळेल आणि अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. अशा स्थितीत आपल्याकडे पुनरागमन करण्याची संधी आहे. विश्वकप स्पर्धेचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. विश्वकप स्पर्धेत खेळताना येथे दिग्गज संघांच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल, याची सर्वांना कल्पना आहे. इंग्लंडचा संघ खेळाच्या तिन्ही विभागात आमच्या तुलनेत सरस होता. चांगला खेळ कसा असतो, हे त्यांनी दाखवून दिले.
बांगलादेशला चांगल्या कामगिरीची आशागेल्या विश्वकप (२०१५) स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाºया बांगलादेश संघ यावेळी त्यापेक्षा सरस कामगिरी करण्यास उत्सुक आहे. भारताविरुद्ध सराव सामन्यात मंगळवारी कर्णधार मशरफी मुर्तजाला स्नायूच्या दुखापतीने सतावले होते, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत तो संघाचे नेतृत्व करेल, अशी आशा आहे. मुर्तजा म्हणाला,‘अशा स्थितीत सुरुवातीचे एक-दोन षटके गोलंदाजी करताना त्रास होतो. त्यानंतर मात्र सर्व सुरुळीत होते.’ तमीम इक्बाल आफ्रिकेविरुद्धच्या लढतीपूर्वी हा सलामीवीर फलंदाज फिट होण्याची आशा आहे. या दोन्ही संघांदरम्यान सन २००२ पासून आतापर्यंत २७ एकदिवसीय सामने झाले असून त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने १८ सामने जिंकले आहेत. बांगलादेशला केवळ तीन सामन्यांमध्ये विजय मिळविता आला आहे. या दोन्ही संघांमधील शेवटच्या तीन लढतींपैकी सर्व सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. या दोन्ही संघांदरम्यान विश्वचषकामध्ये आतापर्यंत तीन सामने झाले असून दक्षिण आफ्रिकेने दोन, तर बांगलादेशाने एका सामन्यामध्ये विजय मिळविलेला आहे. या दोन्ही संघांना आतापर्यंत विश्वचषक जिंकता आलेला नाही.विश्वचषकामध्ये दक्षिण आफ्रिकेने २८४ धावा अशी सर्वाेच्च धावसंख्या उभारली असून बांगलादेशची २५१ ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.