नवी दिल्ली, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : इंग्लंडने यंदा विश्वचषक जिंकला. या विश्वविजयानंतर इंग्लंडने सलामीवीर जेसन रॉयला एक गिफ्ट दिले आहे. या गिफ्टमुळे रॉयच्या कारकिर्दीला वेगळा आयाम मिळू शकतो, असे म्हटले जात आहे.
इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय हा संघासाठी सुदैवी ठरला. कारण तो जेव्हा संघात नव्हता तेव्हा इंग्लंडचा संघ पराभूत होत होता. पण रॉय संघात आल्यावर मात्र इंग्लंडने एकामागून एक विजय मिळवायला सुरुवात केली. रॉय संघात आल्यावर त्याच्या जॉनी बेअरस्टोवबरोबर चांगल्या भागीदाऱ्याही रंगल्या.
विश्वविजयात रॉयला महत्वाचा वाटा होता. त्यामुळे आता त्याला इंगलंडच्या कसोटी संघातही स्थान देण्यात आले आहे. इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यामध्ये एक कसोटी सामना 24 जुलैला लॉर्डस येथे खेळवण्यात येणार आहे. या कसोटी सामन्यासाठी निवड करण्यात आलेल्या संघात रॉयला स्थान देण्यात आले आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अॅशेस कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या अॅशेस मालिकेसाठी इंग्लंड रॉयचा विचार करत आहे. त्यामुळे त्यापूर्वी रॉय हा कसोटी सामन्यात कसा खेळतो, हे इंग्लंडला पाहायचे असल्यामुळे त्यांनी रॉयला कसोटी संघात स्थान दिले असल्याचे म्हटले जात आहे.
Web Title: ICC World Cup 2019: The special gift given by England to Jason Roy after winning the World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.