कोलंबो, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि वेल्स येथे होऊ घातलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेसाठी श्रीलंका संघाने नुकतीच त्यांच्या जर्सीचे अनावरण केले. ही जर्सी पूर्णपणे टाकाऊ पासून टिकाऊ या तत्वावर तयार करण्यात आली आहे. समुद्रातून गोळा केलेल्या प्लास्टिकपासून ही जर्सी तयार करण्यात आली असून श्रीलंकेच्या या इको फ्रेंडली जर्सीचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय संघानेही मागील काही महिन्यांपूर्वी अशाच इको फ्रेंडली जर्सीचे अनावरण केले होते. आज आपण या जर्सीचा प्रवास पाहणार आहोत.
श्रीलंकेचा संघ - दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), अविष्का फर्नांडो, लाहिरू थिरिमाने, कुशल परेरा (विकेटकीपर), कुशल मेंडिस (विकेटकीपर), अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डि'सिल्वा, जेफ्री वैंडेसरे, थिसारा परेरा, इसुरु उडाना, लसिथ मलिंगा, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, जीवन मेंडिस, मिलिंदा श्रीवर्दना. पाहा जर्सीचा प्रवास...
श्रीलंकेचे सामने1 जून - वि. न्यूझीलंड4 जून - वि. अफगाणिस्तान7 जून - वि. पाकिस्तान11 जून - वि. बांगलादेश15 जून - वि. ऑस्ट्रेलिया21 जून - वि. इंग्लंड28 जून - वि. दक्षिण आफ्रिका1 जुलै - वि. वेस्ट इंडिज6 जुलै - वि. भारत