लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : दमदार सुरुवातीनंतर श्रीलंकेचा डाव गडगडला आणि त्यामुळेच त्यांना 201 धावांवर समाधान मानावे लागले. पावसामुळे हा सामान 41 षटकांचा करण्यात आला आणि अफगाणिस्तानपुढे 187 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. एकेकाळी श्रीलंकेची 1 बाद 144 अशी स्थिती होती. पण त्यानंतर त्यांच्या फलंदाजांनी हाराकिरी केली आणि त्यांना अफगाणिस्तानपुढे 202 धावांचे आव्हान ठेवता आले. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने अचूक मारा करत श्रीलंकेच्या चार फलंदाजांना माघारी धाडले.
अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजांना 22 षटकांनंतर पळता भूई थोडी करून सोडले होते. कारण श्रीलंकेचा सलामीवीर कुशल परेराने 78 धावांची खेळी साकारली. त्याला दिमुथ करुणारत्ने (30) आणि लहिरु थिरीमाने (25) यांनी चांगली साथ दिली होती. पण त्यानंतर मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांना जास्त काळ खेळपट्टीवर गत धरता आला नाही. श्रीलंकेच्या तीन फलंदाजांना यावेळी भोपळाही फोडता आला नाही.
'या' कारणासाठी एक क्रिकेटवेडा चक्क झाडावर चढला
क्रिकेट विश्वात बरेच क्रिकेडवेडे आहे आणि ते कधीही काहीही करू शकतात. या गोष्टीचा प्रत्यय विश्वचषक सुरु होत असताना आला आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला सलामीला पाठवावे, यासाठी एक क्रिकेटवेडा चक्क झाडावर चढलेला पाहायला मिळाला.
श्रीलंकेची फलंदाजी चांगली होत नाही, असे या चाहत्याचे म्हणणे आहे. त्यासाठी श्रीलंकेच्या संघ व्यवस्थापनाने थिसारा परेराला सलामीला पाठवावे, अशी मागणी या चाहत्याने केली आहे. ही मागणी करत तो थेट झाडावरच चढला. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू रसेल ऑर्नल्डने या साऱ्या प्रकरणाचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.