लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताने आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत निळ्या जर्सीनेच सर्व सामने खेळले आहेत. मात्र आता इंग्लंडच्या जर्सीचा रंग निळा असल्याने त्यांच्याविरोधात भारतीय संघाला नव्या भगव्या जर्सीमध्ये खेळावे लागणार आहे. यजमान इंग्लंडविरुद्ध रविवारी (30 जून) होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या नव्या भगव्या जर्सीचे अधिकृत अनावरण करण्यात आले. बीसीसीआयने सोशल मीडियावरून या जर्सीचे छायाचित्र सर्वांसमोर आणले.
इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघाची जर्सी निळ्या रंगाची असल्याने भारताला या सामन्यात वेगळ्या रंगाच्या जर्सीने खेळण्याचे निर्देश आयसीसीने दिले होते. नियमानुसार यजमान संघाची जर्सी बदलत नसल्याने इंग्लंडला जर्सीचा रंग बदलण्यापासून सूट मिळाली आहे. त्यामुळेच भारतीय संघ रविवारी इंग्लंडविरुद्ध निळ्या जर्सीत नाही तर भगव्या जर्सीत दिसणार आहे. आता इतकी वर्ष भारतीय खेळाडूंना निळ्या जर्सीत पाहायची सवय लागल्यानंतर ते भगव्या जर्सीत कसे दिसतील हे सर्वच इमॅजिन करू लागले आहेत. आम्ही तुमच्यासाठी Exclusive फोटो घेऊन आलो आहोत.
आतापर्यंत भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत निळ्या रंगाच्या शेड्सच्या जर्सी परीधान केल्या आहेत. पण इंग्लंडचीही जर्सी निळ्या रंगाची असल्यामुळे भारताला त्यांच्यी जर्सीचा रंग बदलावा लागणार आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघ निळ्या रंगाची जर्सी परीधान करत असला तरी कॉलर मात्र ऑरेंज रंगाची आहे. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाच्या जर्सीचे हात ऑरेंज रंगाचे असतील, तर कॉलर निळ्या रंगाची असेल. तसेच पाठीमागील भागही भगवा असणार आहे.
भारतानेच का जर्सीचा रंग बदलायचा, इंग्लंडला सुट का?
भारत आणि इंग्लंड यांचा सामना 30 जूनला होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ 'ऑरेंज जर्सी' परीधान करणार आहे. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या जर्सीचा रंग निळा आहे. त्यामुळे एका संघाला आपल्या जर्सीचा रंग बदलावा लागेल. पण यावेळी भारतानेच का जर्सीचा रंग बदलायचा, इंग्लंडने आपल्या जर्सीचा रंग बदलावा, असे काही जणांचे म्हणणे आहे. पण नियमानुसार यजमान संघाच्या जर्सीचा रंग बदलला जात नाही. त्यामुळे इंग्लंडला यामधून सुट मिळाली आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा संघ निळ्या जर्सीमध्येच उतरणार आहे.