Join us  

ICC World Cup 2019 : भारतीय संघाच्या पत्रकार परिषदेवर मीडियाचा बहिष्कार, जाणून घ्या कारण

ICC World Cup 2019 : Team India sends net bowlers for ICC World Cup press conference, furious media boycotts interaction

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 11:08 AM

Open in App

साउदम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्याला सामोरे जाण्यापूर्वी भारतीय संघावर लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारी सामना होणार आहे आणि या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनी मंगळवारी कसून सराव केला. पण, या सराव सत्रानंतर संघ व्यवस्थापनाने पत्रकार परिषदेसाठी खलील अहमद, अवेश खान आणि दीपक चहर यांना पाठवले. या परिषदेसाठी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री किंवा संघातील वरिष्ठ खेळाडू येणे अपेक्षित होते. परंतु, तसे न झाल्यानं नाराज झालेल्या मीडियाने परिषदेवर बहिष्कार टाकला. 

संघ व्यवस्थापनाने पत्रकार परिषदेसाठी नेट बॉलर्संना पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे चहर व अवेश या परिषदेला गेले. त्यामुळे मीडियाने या परिषदेवर बहिष्कार घातला. प्रसारमाध्यमांनी संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर नाराजी प्रकट केली. भारतीय संघाचे सदस्य नसलेल्या खेळाडूंना पत्रकार परिषदेत पाठवण्यात काय अर्थ, असा सवाल प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधिंनी केला. या निर्णयाबाबत विचारणा केली असता संघ व्यवस्थापक म्हणाले,''भारतीय संघाच्या वर्ल्ड कप मोहिमेला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.'' 2015मध्येही कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्रत्येक पत्रकार परिषदेला हजर असायचा, तर संघातील प्रमुख खेळाडू फक्त BCCI TVकडेच बोलायचे. 

आफ्रिकेला वर्ल्ड कप स्पर्धेत दोन पराभवांचा सामना करावा लागला असला तरी त्यांना हलक्यात लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जेतेपदाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. त्यासाठी भारतीय खेळाडू कसून सरावाला लागले आहेत. विशेषतः भारतीय गोलंदाज आपला दबदबा सिद्ध करण्यासाठी तयार झाले आहेत. सराव सत्रात रोहित शर्माच्या हातावर चेंडू आदळला, परंतु चिंतेचे कारण नाही.  

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराहची 'डोप टेस्ट'! 

भारतीय संघ बुधवारी वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे आणि त्यांना दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराहची नियमित उत्तेजक चाचणी करण्यात आली. जागतिक उत्तेजक चाचणी संघटनेच्या मान्यताप्राप्त संस्थेकडे बुमराहने ही चाचणी करून घेतली. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019बीसीसीआयविराट कोहली