लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी लंडनमध्ये दाखल झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी आतुर आहे आणि जेतेपदाच्या दावेदारांमध्ये भारतीय संघ आघाडीवर आहे. 5 जूनला वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. त्यात त्यांना न्यूझीलंड आणि बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपापल्या जर्सीचे अनावरण केले आहे. भारतीय संघाने आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच वर्ल्ड कप जर्सीचे अनावरण केले होते. पण, भारतीय संघाने त्यावेळी जाहीर केलेली जर्सीच संपूर्ण स्पर्धेत खेळाडू घालणार नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) नव्या नियमानुसार होम व अवे किट घालण्याची परवानगी संघांना देण्यात आली आहे. त्यानुसार भारतीय संघ नवीन जर्सीचे अनावरण करणार आहे. ही जर्सी नारंगी रंगाची असेल, असे सांगण्यात येत आहे आणि अफगाणिस्तान व इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांत मेन इन ब्लू ऑरेंज आर्मीच्या वेशात दिसतील.
आयसीसीने भारतासह तीन संघांना होम व अवे किटची परवानगी दिली आहे. भारतीय संघाने नव्य जर्सीचे अनावरण केले नसले तरी या जर्सीच्या हात नारंगी रंगाचे असतील, असे वृत्त New Indian Express या इंग्रजी दैनिकाने दिले. भारतासह दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनाही पर्यायी जर्सी घालण्याची मुभा देण्यात आली आहे.
Web Title: ICC World Cup 2019 : Team India to wear orange as secondary jersey color in ICC World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.