Join us  

ICC World Cup 2019 : या दोन सदस्यांनी सोडली टीम इंडियाची साथ, कोहलीचे भावनिक ट्विट

भारतीय संघाबरोबरच चाहत्यांसाठीही बुधवार हा काळा दिवस ठरला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 6:40 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप जिंकण्याचे भारताचे स्वप्न अधुरे राहिले आहे. भारतीय संघाबरोबरच चाहत्यांसाठीही बुधवार हा काळा दिवस ठरला होता. आता तर संघातील दोन सदस्यांनी टीम इंडियाची साथ सोडली आहे. याबाबत भारताचा कर्णधाव विराट कोहलीनेही एक भावनिक ट्विट केले आहे.

भारतीय संघाचे फिटनेस ट्रेनर शंकर बसु आणि फिजिओ पॅट्रिक फारहार्ट यांनी वर्ल्ड कपनंतर संघासोबत नव्यानं करार न करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी कल्पना त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही दिली आहे. बीसीसीआयनं करारात वाढ करण्याचा प्रस्ताव त्यांना दिला होता, परंतु दोघांनीही तो अमान्य केल्याचे, वृत्त आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की,''फिटनेस ट्रेनर म्हणून यापुढे संघासोबत काम न करण्याचे बसु यांनी संघ व्यवस्थापनाला सांगितले आहे. त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे. पॅट्रीक यांनीही हिच भूमिका घेतली आहे. वर्ल्ड कप आणि वेस्ट इंडिज मालिकेनंतर त्यांच्या रिप्लेसमेंटचा विचार केला जाईल.''

भारतीय खेळाडूंच्या तंदुरूस्तीचा स्तर उंचावण्यामागे या दोघांची महत्त्वाची भूमिका आहे. शंकर बसु यांनीच यो-यो टेस्ट अनिवार्य केले होते. विराट कोहलीच्या फिटनेसचे श्रेय बसु यांनाच जाते आणि कोहलीनंही ते कबुल केले आहे. कोहली म्हणाला होता की,'' मैदानावरील माझी ऊर्जा आणि शारीरिक परिवर्तनामागे बसु आहेत. त्यांनी मला फिटनेस संदर्भात बरेच काही शिकवलं.'' 

टॅग्स :विराट कोहलीवर्ल्ड कप 2019