Join us  

ICC World Cup 2019 : 'हा' आहे विश्वचषक विक्रमांचा अनोखा संघ

भारताने 1992, 1996, 1999, 2003, 2011 आणि 2015 च्या स्पर्धेतही पाकिस्तानवर विजय मिळवले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 9:10 PM

Open in App

ललित झांबरे, आयसीसी वर्ल्डकप 2019 : बारावी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता एक दिवसावर येऊन ठेपलीय. यानिमित्ताने जगभरातील क्रिकेट विश्वात उत्साहाचे वातावरण आहे. क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला उधाण आहे तर संघांचा आणि खेळाडूंचा कसून सराव सुरू आहे. त्यासोबत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनिमित्ताने आगळे वेगळे विक्रमसुद्धा समोर येत आहेत. अशाच आगळ्या वेगळ्या विक्रमांचा राखीव 12व्या खेळाडूसह विश्वचषक संघ पुढीलप्रमाणे : 12विश्वचषक स्पर्धेत आॅस्ट्रेलियाच्या मॅथ्थ्यू हेडन व अ‍ॅडम गिलख्रिस्ट यांच्या अर्धशतकापेक्षा अधिक धावांच्या भागीदाºया. विश्वचषकात एकाच जोडीच्या या सर्वाधिक अर्धशतकी भागीदाºया आहेत.11आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये निकाली न निघालेले म्हणजे एकतर अनिर्णित राहिलेले किंवा बरोबरीत (टाय) सुटलेले सामने. यापैकी चार सामने ‘टाय’ होते.10विश्वचषक 2019 मध्ये खेळणार असलेले संघ. 1992  नंतर प्रथमच संघांची संख्या एवढी कमी.9सचिन तेंडूलकरने विश्वचषकात जिंकलेले सामनावीर पुरस्कार. स्पर्धेत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम8बिशनसिंग बेदी यांनी एकाच सामन्यात टाकलेली निर्धाव षटक. एका सामन्यात सर्वाधिक निर्धाव षटकांचा 1975 मधील हा विक्रम अजुनही कायम आहे. 72003 च्या विश्वचषक स्पर्धेत सचिन तेंडुलकरच्या अर्धशतकांवरील खेळी. एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकी खेळींचा विक्रम6भारताचे विश्वचषकात पाकिस्तानवर विजय. 1992 पासूनची यशाची मालिका अजुनही कायम. 1996, 1999, 2003, 2011 आणि 2015 च्या स्पर्धेतही विजय5आॅस्ट्रेलियाने जिंकलेली विश्वविजेतेपदं. 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये ठरले क्रिकेट जगताचे सरताज4कुमार संघकाराची लागोपाठ चार शतक. २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेतील पराक्रम.3भारताने खेळलेले विश्वचषक स्पर्धेचे अंतिम सामने. 1983 व 2011 मध्ये विजेतेपद. 2003 मध्ये उपविजेतेपदावर समाधान2विश्वचषक स्पर्धेत दोन द्विशतकं. दोघेही 2015 च्या स्पर्धेत. न्यूझीलंडच्या मार्टीन  गुप्तीलने वेस्टइंडिजविरुध्द नाबाद 237 धावा केल्या तर वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने झिम्बाब्वेविरुध्द २१५ धावांची खेळी केली. 1विश्वविजेतेपदाची हॅट्ट्रीक करणारा एकमेव संघ, आॅस्ट्रेलिया. आपल्या एकूण पाच विश्वविजेतेपदांपैकी 1999, 2003 आणि 2007  अशा लागोपाठ तीन विश्वचषक स्पर्धा त्यांनी जिंकल्या.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019