ICC World Cup 2019 : शिखर धवनच्या दुखापतीबाबत भारतीय संघांने दिले 'हे' अपडेट

या अपडेटनुसार धवन लवकर फिट होईल, अशी आशा वाटत आहे. पण या अपडेटमध्ये नेमके आहे तरी काय, हे जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 10:13 PM2019-06-13T22:13:16+5:302019-06-13T22:14:01+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: update given by Indian teams of Shikhar Dhawan's injury | ICC World Cup 2019 : शिखर धवनच्या दुखापतीबाबत भारतीय संघांने दिले 'हे' अपडेट

ICC World Cup 2019 : शिखर धवनच्या दुखापतीबाबत भारतीय संघांने दिले 'हे' अपडेट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताचा सलामीवीर शिखर धवन हा दुखापतग्रस्त झाला आहे. त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाल्यामुळे आता तो विश्वचषकात खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. पण भारतीय संघाने सामना रद्द झाल्यावर धवनच्या दुखापतीबाबत काही अपडेट दिले आहेत. या अपडेटनुसार धवन लवकर फिट होईल, अशी आशा वाटत आहे. पण या अपडेटमध्ये नेमके आहे तरी काय, हे जाणून घ्या...

हे अपडेट दिले आहेत ते भारताचे सहाय्यक प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी. धवनबद्दल श्रीधर म्हणाले की, " वजनाने हलक्या असलेल्या चेंडूने आम्ही धवनकडून प्रथम सराव करून घेतला. त्यानंतर क्रिकेटच्या चेंडूने आम्ही धवनला सराव करायला सांगितले. हे आव्हानात्मक आहे."


श्रीधर यांच्या म्हणण्यानुसार धवन हा सराव करत आहे. त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले होते. पण हे मोठे फ्रॅक्चर नसल्याचे आता समोर येत आहे. कारण जर फ्रॅक्चर गंभीर असले असते तर धवनला सराव करायलाच दिला नसता. त्यामुळे धवनची गाडी हळूहळू रुळावर येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

रिषभ पंतला भारतीय ड्रेसिंग रुममध्ये नो एंट्री, पण का...
भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे तो यापुढे विश्वचषकात खेळणार की नाही, याबद्दल साशंकता आहे. शिखर जर खेळू शकणार नसेल तर संघात रिषभ पंतला स्थान देण्यात येऊ शकते. रिषभ पंत १६ जूनला मँचेस्टर येथे दाखल होणार आहे. पण पंतला मात्र भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये एंट्री देण्यात येणार नाही.

धवनच्या दुखापतीमुळेच पंतला इंग्लंडला बोलावले गेले आहे. पण जर पंतला भारतीय संघाने बोलावले आहे तर त्याला ड्रेसिंग रुममध्ये स्थान का देण्यात येणार नाही, हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. यासाठी सर्वात महत्वाचे कारण ठरला आहे एक नियम. हा नियम कोणता, ते आपण जाणून घेऊया.
आयसीसीचा नियम काय सांगतो...
जोपर्यंत एखाद्या खेळाडूला कोणत्याही कारणास्तव तुम्ही संघातून बाहेर करत नाही, तोपर्यंत नवीन खेळाडू संघात येऊ शकत नाही. धवन दुखापतग्रस्त असला तरी त्याला संघातून बाहेर काढण्यात आलेले नाही. पंतला धवनचा पर्याय म्हणून इंग्लंडला बोलावण्यात आले असले तरी त्याला बीसीसीआयने अधिकृतरीत्या संघात दाखल केलेले नाही. त्यामुळे धवनला संघाबाहेर केल्यावरच पंत संघात येऊ शकतो. त्यामुळे जर पंत हा संघाचा भाग नसेल तर तो संघाबरोबर राहू शकत नाही. त्याचबरोबर संघाच्या ड्रेसिंग रुममध्येही त्याला प्रवेश देण्यात येऊ शकत नाही.

Web Title: ICC World Cup 2019: update given by Indian teams of Shikhar Dhawan's injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.