लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडविरुद्धच्या लढतीत 37 वर्षीय धोनीच्या थुंकीतून रक्त पडतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारताला हा सामना गमवावा लागला होता. धोनीला या सामन्यात दुखापत झाली होती. ही दुखापत किती गंभीर आहे, हे आज आलेल्या अपटेडमध्ये समोर आले आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीवर सध्या टीकेची झोड उठत आहे. त्याच्या संथ खेळावर क्रिकेट चाहत्यांसह माजी खेळाडूंनीही आक्षेप नोंदवला आहे. धावा घेण्यासाठी धोनीला संघर्ष करावा लागत आहे. त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पण, आणखी एका कारणानं धोनी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
या सामन्यात धोनीला दुखापत झाल्याचे कुणाला लक्षातही आले नाही. दुखापत होऊनही धोनी मैदानावर टिकून राहिला. या सामन्यात धोनीच्या अंगठ्याला दोनवेळा दुखापत झाली. एकदा यष्टिरक्षण करताना आणि दुसऱ्यांदा फलंदाजी करताना. फलंदाजी करताना धोनीच्या थुंकीतून रक्त पडतानाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावरून त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेच वातावरण होतं. पण, अंगठ्याला झालेल्या दुखापतीतून ते रक्त येत होते, धोनीनं तो अंगठा चूपला आणि त्यानंतर त्यानं थुंकले. त्यामुळेच त्याच्या थुंकीतून रक्त पडत होते.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्या धोनीचा अंगठा दुखावला होता. त्यामुळे काही काळ धोनी मैदानाबाहेरही होता. आता या दुखापतीवर अपडेट आले आहे. धोनीची ही दुखापत पूर्णपणे बरी झाली आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये धोनी खेळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संघातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
इंग्लंडविरुद्ध 338 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातच निराशाजनक झाली. सलामीवीर लोकेश राहुल ( 0) माघारी परतल्यानंतर तिसऱ्या षटकात कोहली मैदानावर आला. धावांचा पाठलाग करण्यात सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून कोहली ओळखला जातो. त्यामुळे रोहित शर्मासह तो संघाला विजय मिळवून देईल असा आत्मविश्वास होता. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली. या दोघांनी जवळपास 25 षटकं खेळून काढली. या जोडीनं जवळपास 5.30 च्या सरासरीनं धावा केल्या.
Web Title: ICC World Cup 2019: Update: 'This' update has come on MS Dhoni's injury...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.