मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : महेंद्रसिंग धोनीचा हा अखेरचा वर्ल्ड कप असेल कदाचित.. 38 वर्षीय धोनी 2023मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची शक्यता फार कमीच आहे.. त्यामुळेच न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाचा झालेला पराभव हा मनाला चटका देणारा ठरला. धोनीनं अखेरपर्यंत खिंड लढवत भारताच्या विजयासाठी प्रयत्न केले, परंतु मार्टिन गुप्तीलचा तो एक अचूक थ्रो आणि धोनीची पडलेली विकेट, यानं सर्व काही बदलून टाकले. 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला 18 धावा कमी पडल्या आणि वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांचे आव्हानही संपुष्टात आले. धावबाद झाल्यानंतर तंबूत परणाऱ्या धोनीला पाहून सारेच भावूक झाले होते. कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा धोनीलाही रडावेसे वाटत होते, परंतु त्यानं भावनांच्या बांध फुटू दिला नाही.
Video : विराट कोहली अन् रवी शास्त्री यांच्यात तू तू मै मै; पंत बाद होताच कॅप्टन भडकला, पण का?
भारताचे आघाडीचे तीनही फलंदाज अवघ्या 5 धावांवर तंबूत परतले होते. रिषभ पंत व हार्दिक पांड्या यांनाही अपयश आले. चुकीच्या वेळी चुकीचा फटका मारणे दोघांनाही महागात पडले. त्यानंतर धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी 116 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला आणि विजयाच्या आशाही पल्लवीत केल्या. पण, ट्रेंट बोल्टनं ही जोडी फोडताना जडेजाला माघारी पाठवले. त्यानंतर मार्टीन गुप्तीलनं अचून थ्रो करून धोनीला धावबाद केले आणि भारताचा पराभव निश्चित झाला.
कारकिर्दीतील अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेचा असा शेवट होईल, हे धोनीलाही अपेक्षित नव्हते. त्यामुळे बाद झाल्यावर तंबूत परतत असताना त्याचे डोळे पाणावले होते, फक्त त्यानं त्यांना वाट मोकळी करून दिली नाही. प्रथमच धोनी असा रडवेला पाहायला मिळाला आणि त्याची ही भावनिक मुद्रा पाहून क्रिकेटप्रेमीही भावनिक झाले.
ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीला सातव्या क्रमांकावर का पाठवलं; कोहलीनं सांगितलं लॉजिक
पाहा व्हिडीओ....