Join us  

ICC World Cup 2019 : धक्कादायक... विराट कोहली करतोय चक्क बॉलिंगची प्रॅक्टीस, पाहा हा व्हिडीओ

या विश्वचषकात भारताची गोलंदाजी सर्वात भेदक असल्याचे म्हटले जात आहे. पण तरीदेखील विराट कोहली नेट्समध्ये बॉलिंगची प्रॅक्टीस करताना पाहायला मिळाला आणि सर्वांनाच धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 4:23 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विश्वचषकाला गुरुवारी सुरुवात झाली, पण भारताचा पहिला सामना मात्र ५ जूनला खेळवण्यात येणार आहे. या विश्वचषकात भारताची गोलंदाजी सर्वात भेदक असल्याचे म्हटले जात आहे. पण तरीदेखील विराट कोहली नेट्समध्ये बॉलिंगची प्रॅक्टीस करताना पाहायला मिळाला आणि सर्वांनाच धक्का बसला.

भारताकडे जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि हे वेगवान गोलंदाज आहे. भुवनेश्वर कुमारसारखा स्विंग गोलंदाज आहे. त्याचबरोबर हार्दिक पंड्या आणि विजय शंकरसारखे मध्यमगती गोलंदाज आहेत. कुलदीप यादव, युजवेंद्र चहल  आणि रवींद्र जडेजासारखे फिरकीपटू आहे. कामचलाऊ गोलंदाज म्हणून केदार जाधव आणि रोहित शर्माही संघात आहेत. एवढा गोलंदाजांचा तोफखाना असताना कोहली बॉलिंगची प्रॅक्टीस नेमकी का करतोय, हे अनाकलनीय असल्याचे म्हटले जात आहे.

हा पाहा खास व्हिडीओ

सचिन तेंडुलकर सांगतोय 'हे' तीन खेळाडू ठरतील गेम चेंजर! महान फलंदाज सचिन तेंडुलकरने वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात समालोचकाच्या भूमिकेत पदार्पण केले. समालोचन करताना तेंडुलकरने वर्ल्ड कप स्पर्धेतील तीन गेम चेंजर खेळाडूंची नावं सांगितली. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर, अफगाणिस्तानचा रशीद खान आणि इंग्लंडचा जोफ्रा आर्चर यांचा बोलबाला राहील, असे तेंडुलकर म्हणाला.रशीदविषयी तो म्हणाला,''या स्पर्धेत रशीद हा गेम चेंजर ठरेल. पण त्याला एक सल्ला देऊ इच्छितो, त्याने 50 षटकांच्या सामन्याचा कसोटी सामन्याप्रमाणे विचार करावा. प्रतिस्पर्धी फलंदाजांना त्यानं आव्हान देत रहावं. आक्रमक फिल्डींग लावून फलंदाजांना मिड ऑन व मिड ऑफ वरून खेळण्यास भाग पाडावे.''वॉर्नरची आयपीएलमधील दमदार कामगिरीची पुनरावृत्ती वर्ल्ड कपमध्येही पाहायला मिळेल, असा विश्वास तेंडुलकरने व्यक्त केला. तो म्हणाला,'' आयपीएलमध्ये वॉर्नरचा खेळ मी पाहिला. तो धावांसाठी भूकेला दिसला. त्याच्या खेळात एकाग्रता जाणवली. तो दृढ निश्चयाने वर्ल्ड कप स्पर्धेत दाखल झाला आहे.''कठीण परिस्थितीत विविध प्रकारचे चेंडू टाकण्याची क्षमता असलेल्या आर्चरने तेंडुलकरला प्रभावित केले आहे. आर्चरने पहिल्याच सामन्यात तीन विकेट घेत आफ्रिकेला मोठा धक्का दिला आणि इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.'' कठीण प्रसंगी इंग्लंडचा संघ आर्चरला गोलंदाजीसाठी पाचारण करतील. एखादी भागीदारी तोडायची असल्यास आर्चर महत्त्वाचा गोलंदाज ठरू शकतो,'' असे तेंडुलकरने सांगितले.

टॅग्स :विराट कोहलीवर्ल्ड कप 2019